News

राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यां ना दिवाळीपूर्वी मदत देण्याचा सरकारचा निर्णय आहे, अशी माहिती दिली.

Updated on 25 October, 2021 1:39 PM IST

राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना दिवाळीपूर्वी मदत देण्याचा सरकारचा निर्णय आहे, अशी माहिती दिली.

यावेळी बोलताना वडेट्टीवार यांनी सांगितले की,वित्त आयोगाकडूनमदत व पुनर्वसनखात्याकडे निधी वर्ग केला जाईल.  दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहेत.

 झालेल्या अतिवृष्टी मध्ये 55 लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याची माहिती सर्वेक्षणातून पुढे आली आहे.

सर्वाधिक नुकसान हे मराठवाड्यात झालेले असून  त्याखालोखाल विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात आणि इतर जिल्ह्यातील नुकसान झाले आहे. मराठवाड्यात जवळजवळ 70 टक्के नुकसान झाले असल्यामुळे सर्वाधिक गरज मराठवाड्यातील शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. मदतीच्या सुरुवात मराठवाडा पासून होणार आहे. पहिल्या टप्प्यात 3700 कोटी रुपयांचा निधी वाटला जाईल असं विजय वडेट्टीवार म्हणाले. 

एनडीआरएफच्या निकषांप्रमाणे केंद्र सरकारकडून अद्याप कोणत्याही प्रकारचा निधी आलेला नाही. मात्र तो निधीलवकर येईल अशा अपेक्षा असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.तसेच अकोला, अमरावती आणि वाशिम भागातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी निधी दिला जाईल,असेही वडेट्टीवार यांनी सांगितले.

English Summary: heavy rain and flood affected farmer will receive compansation cash before diwali
Published on: 25 October 2021, 01:39 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)