जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि नद्यांना आलेल्या महापुरामुळे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा आणि भडगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली. या झालेल्या नुकसानीची माहिती पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी मंत्रिमंडळात झालेल्या बैठकीत दिली.
यातील तालुक्यांमध्ये झालेल्या नुकसानीचा विचार केला तर या तीनही तालुक्यांमध्ये जवळजवळ एकशे आठ घरांची पूर्णतः पडझड झाली आहे तर तीनशे सहा दुकाने क्षतिग्रस्त झाले आहेत. इतकेच नाही तर पंधरा हजार 195 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे फळपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे क्या झालेले नुकसान ची माहिती मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत पाटील यांनी दिली.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जळगाव जिल्ह्यातील तीनही तालुक्यांमध्ये झालेल्या नुकसानीचे प्रस्ताव तातडीने पाठवण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले असून त्यानंतर लगेचच मदत दिली जाणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे, अशी माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
या झालेल्या अतिवृष्टीमुळे व आलेल्या महापुरामुळे चाळीसगाव तालुक्याचे आणि शहराचे आतून नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीचा फटका पाचोरा व भडगाव तालुक्याला ही बसला आहे.परंतु तुलनेने कमी आहे. या झालेल्या आपत्तीची माहिती मिळताच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तात्काळ चाळीसगाव तालुक्याला भेट देऊन मदत कार्याचा आढावा घेतला होता. तसेच पंचनामे करण्याची तातडीची निर्देश त्यांनी दिले होते.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंत्री गुलाबराव पाटील यांनी झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती दिली. या झालेल्या अतिवृष्टीमुळे चाळीसगाव तालुक्यातील 42, पाचोरा तालुक्यातील चार तर भडगाव तालुक्यातील दोन असे एकूण 38 गावे बाधित झाली आहेत.या आपत्ती मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती श्री. पाटील यांनी दिली.
या मागणीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मान्यता दिली असून कोकणच्या धर्तीवर ही मदत आपदग्रस्तांना तातडीने देण्यात येणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे, असे मंत्री श्री. गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
Published on: 03 September 2021, 10:25 IST