News

राज्यात अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे २५ जिल्ह्यांतील एक लाख ३९ हजार २२२ हेक्टरवरील काढणीला आलेली रब्बी पिके, फळपिके आणि पालेभाज्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मिटल्यामुळे पुढील दोन दिवसांत पंचनामे पूर्ण केले जाणार आहेत.

Updated on 21 March, 2023 3:28 PM IST

राज्यात अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे २५ जिल्ह्यांतील एक लाख ३९ हजार २२२ हेक्टरवरील काढणीला आलेली रब्बी पिके, फळपिके आणि पालेभाज्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मिटल्यामुळे पुढील दोन दिवसांत पंचनामे पूर्ण केले जाणार आहेत.

पंचनामे करून संबंधित अहवाल राज्य सरकारला पाठविला जाईल. बाधितांना नियमानुसार मिळणारी मदत राज्य सरकारकडून देण्यात येईल. केंद्र सरकारची मदत घ्यावयाची ठरल्यास राष्ट्रीय आपत्ती निवारण (एनडीआरएफ) विभागाचे पथक येऊन तपासणी करेल, असे कृषी संचालक, (विकास आणि विस्तार) विकास पाटील यांनी सांगितले. कृषी खात्याच्या नैसर्गिक आपत्ती विभागाने पंचनामा झालेल्या बाधित क्षेत्राची जिल्हानिहाय माहिती दिली. नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक २३८२१ हेक्टरवर नुकसान झाले आहे.

त्याखालोखाल जालन्यात १५०८० हेक्टर आणि नगर जिल्ह्यात १२१९८ हेक्टर, तर बीडमध्ये ११३५६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. लातूर जिल्ह्यात ११७९५ हेक्टर, धुळय़ात ९०१७ हेक्टर, जळगावात ९५२९ हेक्टर, छत्रपती संभाजीनगरमध्ये ७७६२ हेक्टरवरील पिकांची नासाडी झाली. यवतमाळमध्ये ६५३९ हेक्टर, हिंगोलीत ५६०४ हेक्टर, नाशिकमध्ये ४२७५ हेक्टर, वाशिमध्ये ४९८१ हेक्टर, बुलढाण्यात ३१४७ हेक्टर, पालघरमध्ये २०१७ हेक्टर, नंदुरबारमध्ये १८१४ हेक्टर, सोलापुरात ३९७७ हेक्टर, अमरावतीत १५१७ हेक्टर, परभणीत २४०० हेक्टर, अकोल्यात ६४३ हेक्टर, साताऱ्यात ४८४ हेक्टर, पुण्यात ५७९ हेक्टर, ठाण्यात ११७ हेक्टर आणि वध्र्यात सर्वात कमी ८६ हेक्टरवरील विविध पिकांची अतोनात हानी झाली आहे.

शेतकऱ्यांनो कांदा काढताना घ्यावयाची काळजी

येत्या दोन दिवसांत पंचनामे करू’ : अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले जात आहेत. येत्या दोन दिवसांत ते काम पूर्ण करून शेतकऱ्यांना मदत जाहीर केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी विधान परिषदेत केली. मदतीला होणाऱ्या विलंबावरून विधानसभेत विरोधकांनी सरकारला धारेवर धरत सभात्याग केला.

राज्यात दोन वर्षात येणार 900 ऊसतोडणी यंत्रे, मजुरांना अतिरिक्त पैसे देण्याची गरज पडणार नाही..

संप काळातही कर्मचाऱ्यांनी पंचनामे करण्यास मदत केली. सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मिटल्यामुळे तीन दिवसांत बाधित क्षेत्राचे पंचनामे पूर्ण केले जातील. असेही सांगण्यात आले आहे. मात्र काम सुरु झाले नाही.

गारपिटीत शेतकऱ्याने वाचवली द्राक्ष बाग, उत्पादकाने चालवले डोकं, आणि....
जगातलं सगळ्यात महागडं फळ! शेतकरी होतील मालामाल...
गाय आणि म्हशी कमी दूध देतात? याकडे लक्ष द्या होईल फायदा..

English Summary: Heavy crop damage due to bad weather, 25 districts affected, loss on 1 lakh 39 thousand hectares..
Published on: 21 March 2023, 03:28 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)