राज्यात आजपासून उन्हाचा चटका वाढणार असून मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा इशाऱा हवामान विभागाने दिला आहे. राज्यात कमाल तापमानात मोठी वाढ झाली आहे असून विदर्भ, मराठवाड्याला उन्हाचे चटके सहन करावे लागत आहे. यासह उत्तर महाराष्ट्रावरही सुर्य कोपला आहे.
रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे राज्यातील यंदाच्या हंमाचे उच्चांकी ४४.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले आहे.
दरम्यान राज्यातील विविध भागात दुपारपर्यंत उन्हाचा चटका सहन करावा लागतो, आणि दुपारनंतर ढगाची निर्मिती होऊन वादळी पाऊसाचे वातावरण तयार होत आहे. काल विदर्भात तापमानाचा पारा हा ४१ ते ४५ अंशादरम्यान होता. मराठवाड्यात कमाल तापमान ४१ ते ४४ अंश, मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागातील तापमान ३८ ते ४३ अंश, कोकणाात ३३ ते ३५ अंशादरम्यान तापमान आहे. पुढील गुरुवारपर्यंत राज्याता उन्हाचा चटका वाढणार असून, विदर्भात, मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या दोन्ही बाजूंच्या हवेत आर्द्रता आहे. दक्षिण-पूर्वेकडून ते पूर्वेकडील वाऱ्याच्या या स्थितीमुळे या भागात ४ ते ५ मे रोजी वेगळ्या गडगडाटी वादळासह पाऊस आणि गारपिट होण्याची शक्यता हवामान विभागाने म्हटले आहे. पश्चिम हिमालयी प्रदेश (जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड) येथेही पाऊस / पाऊस पडण्याची शक्यता आहे. या भागात जोरदार वारा ताशी ३० ते ४० किमीने वाहणार आहे. यासह या भागात ६ मे ते ७ मेपासून गडगडाटी वादळासह पावसाची हालचाली वाढण्यीच शक्यता आहे.
Published on: 04 May 2020, 12:13 IST