मोबाईल क्षेत्रातली अग्रगण्य कंपनी व्हीआय ने वोडाफोन आयडिया च ग्राहकांसाठी मोबाईल रिचार्जवर हेल्थ इन्शुरन्स देण्यासाठी आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स सोबत करार केला आहे. व्ही आय कंपनीने 51 रुपये आणि 301 रुपयांच्या मोबाईल रिचार्ज वर इंडस्ट्री चा पहिला व्ही आय होस्पिकेअर लॉन्च केला आहे.
ह्या मध्ये कंपनीच्या ग्राहकांना हेल्थ इन्शुरन्स चे कव्हर मिळणार आहे. व्ही आय कंपनी च्या ग्राहकांना 24 तासांच्या कालावधीच्या आत दवाखान्यात भरती साठी हजार रुपयांपर्यंतचे निश्चित कव्हर मिळते तसेच आयसीयू साठी दोन हजार पंचा हेल्थ कवर देखील उपलब्ध होणार आहे.
व्ही आय होस्पिकेअर च्या महत्वाच्या गोष्टी
- 51 रुपयांचा रिचार्ज वर ग्राहकाला 500 एसेमेस फ्री मिळतील तसेच त्याची व्हॅलिडीटी 28 दिवसांचे असेल.
- यामध्ये हजार रुपयांचा हेल्थ बेनिफिट मिळेल.
- 301 रुपयांच्या रिचार्ज प्लान मध्ये अनलिमिटेड कॉल, दीड जीबी प्रतिदिन डेटा, यामध्ये 2जीबी अतिरिक्त डाटा ची भर टाकण्यात आली आहे. सोबत 100 एस एम एस बेनिफिट मिळेल. या प्लान ची व्हॅलिडीटी 30 दिवसांचे असेल.
- ग्राहक जर आयसीयूत भरती झाले तर ग्राहकांना दिवसाला दोन हजार रुपयांचा फायदा होतो.
- एक्सीडेंट झाल्यास प्रतीक्षा कालावधी लागू नये.
- काही आजारांमध्ये दोन वर्षाची प्रतीक्षा कालावधी लागू नाही.
व्ही आय होस्पिकेअर वोडाफोन आयडिया प्रीपेड ग्राहकांना हॉस्पिटल डायजेशन कव्हर मिळतो. तसेच या ऑफरमध्ये covid-19 किंवा कोणत्याही आजारामुळेहॉस्पिटल डायजेशन चा समावेश करण्यात आला आहे. तसेच व्ही आय होस्पिकेअर हे अठरा ते 55 वर्षे वयोगटातील लोकांसाठी आहे.
Published on: 05 March 2021, 07:43 IST