News

आता तुम्ही पेटीएम द्वारे एलपीजी सिलेंडर बुक केले तर तुम्हाला 500 रुपयांपर्यंत कॅशबॅक प्राप्त होऊ शकतो. देशातील बहुतांश भागांमध्ये एलपीजी सिलेंडर सबसिडीनंतर सिलेंडर 700 ते साडे सातशे रुपयांपर्यंत आहे.

Updated on 06 January, 2021 4:29 PM IST

आता तुम्ही पेटीएम द्वारे एलपीजी सिलेंडर बुक केले तर तुम्हाला  500 रुपयांपर्यंत कॅशबॅक प्राप्त होऊ शकतो. देशातील बहुतांश भागांमध्ये एलपीजी सिलेंडर सबसिडीनंतर सिलेंडर 700 ते साडे सातशे रुपयांपर्यंत आहे. जर अशा तुम्ही पेटीएमद्वारे कॅश बॅकचा फायदा उठवून तुम्ही 200 ते 250 रुपयात एचपी, इंडियन, भारत गॅस इत्यादी कंपन्यांचे सिलेंडर घेऊ शकता. तर जाणून घेऊया काय आहे ऑफर...

आता तुम्ही पेटीएम द्वारे एलपीजी सिलेंडर बुक केले तर तुम्हाला  500 रुपयांपर्यंत कॅशबॅक प्राप्त होऊ शकतो. देशातील बहुतांश भागांमध्ये एलपीजी सिलेंडर सबसिडीनंतर सिलेंडर 700 ते साडे सातशे रुपयांपर्यंत आहे. जर अशा तुम्ही पेटीएमद्वारे कॅश बॅकचा फायदा उठवून तुम्ही 200 ते 250 रुपयात एचपी, इंडियन, भारत गॅस इत्यादी कंपन्यांचे सिलेंडर घेऊ शकता. तर जाणून घेऊया काय आहे ऑफर...

 पेटीएम देत आहे कॅशबॅक ऑफर

 पेटीएमने आपल्या ॲपद्वारे गॅस सिलेंडर बुक केल्यास पाचशे रुपये कॅश बॅक ऑफर लागू केली आहे. पेटीएम ॲपद्वारे पहिल्यांदा गॅस सिलेंडर बुक केल्यास 500 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकतो. यासाठी ग्राहकांना एक कोड टाकावा लागतो. या ऑफर बद्दल तपशीलवार माहिती घेऊ.

हेही वाचा: गॅस कनेक्शनची सब्सिडी थांबली आहे का? अशी तपासा इंडियन गॅसचा सब्सिडी

 

ही ऑफर 31 डिसेंबर 2020 पर्यंत व्हॅलिड

 या ऑफरचा फायदा घेण्यासाठी ग्राहकांना प्रोमो सेक्शनमध्ये फर्स्ट एलपीजी टाकावे लागते. ग्राहक या पेटीएम ऑफरचा उपयोग ऑफरच्या वैध कालावधीमध्ये फक्त एकदा घेऊ शकतात. ही ऑफर 31 डिसेंबर 2020 पर्यंत वैध आहे. म्हणजेच आजपासून दोन दिवस तुमच्या हातात आहे.

 या ऑफरचा फायदा कसा घ्याल

 या ऑफरचा फायदा घेण्यासाठी सुरुवात आगोदर रिचार्ज आणि पे  बिल्स या पर्यायावर अगोदर जावे, त्यानंतर बुक सिलेंडर यावर टेप करावे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या सिलेंडरविषयी सगळी माहिती द्यावी लागते. त्यानंतर पेमेंट करण्याच्या अगोदर ऑफरवर फर्स्ट एलपीजी प्रोमो कोड टाकणे आवश्यक आहे. एलपीजी डिलिव्हरीसाठी पेटीएमने भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल, आणि हिंदुस्तान पेट्रोलियम सोबत करार केला आहे.

 पेटीएमवरून सिलेंडर बुक करण्यासाठी फॉलो करा पुढील स्टेप

 सगळ्यात आगोदर मोबाईलमध्ये पेटीएम ॲप ओपन करा. ॲप ओपन केल्यानंतर कुठलाही ऑप्शन दिसत नसेल तर शो मोर वर क्लिक करा. त्यानंतर रिचार्ज आणि पे बिल हा पर्याय डाव्या बाजूला दिसेल. जेव्हा तुम्ही या पर्यायावर टॅप करा तेव्हा तुम्हाला बरेच प्रकारचे पर्याय दिसतील. येथे तुम्हाला बुक अ सिलेंडर हा पर्याय दिसेल. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा गॅस प्रोव्हायडर निवडावा लागेल. गेस प्रोव्हायडर निवडल्यानंतर गॅस एजन्सीद्वारा दिला गेलेला रजिस्टर मोबाईल नंबर व आयडी नोंद करावा. जसे तुम्ही डिटेल्स टाकून प्रोसीड वर क्लिक केले तुमच्यासमोर ग्राहकाचे नाव, एलपीजी आयडी आणि संबंधित एजन्सीचे नाव येते.

कॅशबॅक ऑफरचे नियम आणि पद्धत

 पेटीएम द्वारे पहिल्यांदा गॅस सिलेंडर बुक केल्यावर ही ऑफर आहे. पेटीएम गॅस बुकिंग प्रोमो कोड हा फर्स्ट एलपीजी या प्रोमो कोड सेक्शन मध्ये टाकावा लागतो. या प्रोमो कोड वर 500 रुपये चल बाय दिला जातो. जर तुम्ही हा कोड टाकायला विसरलात तर तुम्हाला कॅशबॅक प्राप्त होणार नाही. या ऑफरचा उपयोग ग्राहक ऑफर वैध काळामध्ये घेऊ शकतात.

English Summary: Have you heard! You can get a cylinder for only Rs 200
Published on: 30 December 2020, 03:03 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)