News

देशात स्पोर्ट्स बाईक सेगमेंटला पसंत करणाऱ्या बाईकप्रेमींची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे बजाज, हिरो, होंडा, सुझुकी, यामाहा आणि टिव्हीएस सारख्या कंपन्यांनी या बाईकची एक मोठी रेंज मार्केटमध्ये आणली आहे. पंरतु या दुचाकींची किंमत जास्त असल्याने अनेक बाईक प्रेमी बाईक घेऊ शकत नाहीत.

Updated on 05 November, 2021 11:14 PM IST

देशात स्पोर्ट्स बाईक सेगमेंटला पसंत करणाऱ्या बाईकप्रेमींची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे बजाज, हिरो, होंडा, सुझुकी, यामाहा आणि टिव्हीएस सारख्या कंपन्यांनी या बाईकची एक मोठी रेंज मार्केटमध्ये आणली आहे. पंरतु या दुचाकींची किंमत जास्त असल्याने अनेक बाईक प्रेमी बाईक घेऊ शकत नाहीत.

परंतु आज आम्ही तुम्हाला बजाज पल्सर आरएस २०० वर मिळणाऱ्या ऑफरविषयी सांगणार आहोत. यात तुम्ही या १.६३ लाख रुपये किंमतीची स्पोर्ट्स बाईक केवळ ८६ हजार रुपयांमध्ये खरेदी करु शकता. मात्र त्यापूर्वी तुम्हाला या बाईकचे फिचर्स, मायलेज आणि स्पेसिफिकेशनची पूर्ण तपशील जाणून घेणे गरजेचे आहे.

बजाज पल्सर आरएस २०० बाईक एक प्रीमियम स्पोर्ट्स बाईक आहे. दमदार डिझाईन आणि स्पीडमुळे ती पसंतीला उतरते. या बाईकमध्ये कंपनीने १९९.५ सीसीचे सिंगल सिलिंडर इंजिन दिले आहे. जे लिक्विड कुल्ड फ्युएल इंजेक्शन तंत्रज्ञानावर आधारित डीटीएसआय एफआय इंजिन आहे. हे इंजिन २४.५ पीएसचे पाॅवर आणि १८.७ एनएमचे पीक टाॅर्क जनरेट करते. त्याबरोबर ६ स्पीड गिअरबाॅक्स देण्यात आले आहेत.

बाईकच्या ब्रेकिंग सिस्टिमविषयी बोलाल तर कंपनीने तिचे दोन्ही चाकांमध्ये डिस्क ब्रेकचे काॅबिनेशन दिले आहे. बजाज पल्सर आरएस २०० ची मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे, की बाईक ३५ किलोमीटर प्रतिलीटरचे मायलेज देते.

 

काय आहे बाईकची ऑफरविषयी जाणून घेऊया...

या स्पोर्ट्स बाईकवर ऑफर दिले आहे सेकंड हँड बाईक खरेदी-विक्री करणारे संकेतस्थळ BIKES24 ने. तिने पल्सरला आपल्या साईटवर लिस्ट केले आहे आणि तिची किंमत ८६ हजार रुपये ठेवली आहे. संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, या बाईकचे माॅडल २०१८ आहे. तिची ऑनरशीप फर्स्ट आहे. बाईक आतापर्यंत ३५ हजार १२१ किलोमीटर धावली आहे. तिची नोंदणी उत्तर प्रदेशच्या UP14 आरटीओमध्ये आहे. या बजाज पल्सर आरएस २०० बाईक खरेदीवर कंपनी काही अटींसह एक वर्षाची वाॅरंटी आणि सात दिवसांत मनी बॅक गॅरंटी प्लॅन देऊ करित आहे. या मनी बॅक गॅरंटीनुसार, ही बाईक खरेदीच्या सात दिवसाच्या आत पसंत न आल्यास तुम्ही ती कंपनीला परत करु शकता. त्यानंतर कंपनी तुमचे पूर्ण पेमेंट परत करेल.

English Summary: Have you heard The 1.6 lakh Bajaj Pulsar RS200 sports bike will be available for only Rs 86,000
Published on: 05 November 2021, 11:14 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)