भोपाळ: आंब्याच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा असं गाणं आपण ऐकलं असेल. या गाण्याप्रमाणेच एक प्रयोग भोपाळमध्ये करण्यात आला आहे. फक्त येथे आंब्याला शेवगा लागला नाही. येथे वांग्याच्या झाडाला टोमॅटो लागले आहेत. येथील आदिवाशी मुलांनी हा प्रयोग यशस्वी केला आहे. मध्य प्रदेशातील कुंडम आणि कटनी जिल्ह्यातील आदिवासी मुले (Tribal children) आजकाल खूप चर्चेत आहेत.
कारण ही मुलं जे करतात, ते काम अनुभवी शेतकरी सुद्धा सहज करू शकत नाहीत. ही मुले इतकी प्रशिक्षित झाली आहेत की ते वांग्याच्या झाडांमध्ये टोमॅटो पिकवत आहेत. हे कलम पद्धतीद्वारे (horticulture benefits of grafting) केले जाते परंतु ते इतके सोपे काम नाही. परंतु या दोन जिल्ह्यांतील 30 गावांतील 498 मुले कलम बनवण्याच्या कौशल्यात पारंगत झाली आहेत.
फलोत्पादन योजनेअंतर्गत प्रशिक्षित
प्रत्यक्षात, दोन्ही जिल्ह्यांतील 498 मुले आदिवासीबहुल क्षेत्र असलेल्या धीमरखेडा येथे फळबागांमध्ये कलमांचे बारकावे शिकत आहेत. कलमी रोपांमुळे झाडे दोन महिन्यांत फळे देण्यास सुरुवात करतात. तसेच त्यांचे उत्पादन देखील सामान्य टोमॅटोच्या रोपांपेक्षा जास्त असते.
ही कलमे तयार करणारी सर्व मुले 10 ते 15 वयोगटातील आहेत. कलमी रोपांमध्ये ही मुले एवढी हुशार झाली आहेत की, ती त्याच रोपातून टोमॅटो, शिमला मिरची आणि काकडी तयार करण्याच्या कामात व्यग्र आहेत.
कलम करण्याचे फायदे
कलम तंत्राचा सर्वात मोठा फायदा म्हणजे या तंत्रात उगवलेली झाडे खूप मजबूत असतात आणि प्रतिकूल परिस्थितीतही दीर्घकाळ टिकतात. शेतात 72 ते 96 तास पाणी साठून राहिले तरी ही झाडे खराब होत नाहीत. टोमॅटोच्या इतर प्रजाती 20 ते 24 तासांपेक्षा जास्त काळ पाणी साचलेल्या शेतात तग धरू शकत नाहीत. कलम बनवण्याच्या तंत्रामुळे घराच्या छतावरही रोपे सहजपणे लावता येतात.
या पद्धतीचा अवलंब करून शेतकरी चांगले उत्पन्नही मिळवू शकतात. या पद्धतीद्वारे आपण एकाच वनस्पतीपासून दोन वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या किंवा फळे घेऊ शकतो. साध्या बियांपासून भाज्या आणि फळांचे उत्पादन कमी होत आहे, तर कलम लावण्याद्वारे, अशी साधी बियाणे अधिक उत्पादन घेऊ शकते.
कलमासाठी वांगी का निवडली जातात?
यासाठी टोमॅटो आणि वांगी नर्सरी एकत्र तयार केली जाते. अडीच महिन्यांनी दोन्हीची झाडे समान येतात. वांग्याची झाड मजबूत आहे आणि टोमॅटोचे झाड कमकुवत असते त्यामुळे ती एकदाच फळ देते. तर वांग्याची झाडे मजबूत असतात, म्हणून ती कलमासाठी निवडली जाते.
मुले घरीच तयार करतात कंपोस्ट
या मुलांना एका संस्थेने प्रशिक्षण दिले आहे. मुलांना कृषी क्षेत्रात स्वावलंबी बनवण्यासाठी कृषी उपकरणे देण्यात आली आहेत. मुलांना त्यांच्या घरी कचऱ्यापासून कंपोस्ट बनवण्याची माहितीही देण्यात आली आहे. मुले स्व:त खत बनवूनही वापरतात. यासोबतच मुलांच्या शिक्षणाचीही काळजी घेतली जाते.
Published on: 17 September 2021, 09:43 IST