News

Pm Kusum Yojna :-शेतकऱ्यांच्या दृष्टीने विजेची उपलब्धता वेळेवर असणे याला खूप महत्त्व आहे. परंतु शेतीमध्ये विचार केला तर बऱ्याचदा विहिरींमध्ये पाणी असते पण वीज वेळेवर उपलब्ध नसल्यामुळे पिकांना पाणी देता येत नाही व त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता वाढते. तसेच शेती करिता जो काही विजेचा पुरवठा होतो तो देखील बऱ्याचदा रात्रीच्या वेळी होत असल्याने शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून रात्री पिकांना पाणी द्यायला जावे लागते व त्यामुळे जीवाला धोका देखील संभवतो.

Updated on 08 August, 2023 8:58 PM IST

Pm Kusum Yojna :-शेतकऱ्यांच्या दृष्टीने विजेची उपलब्धता वेळेवर असणे याला खूप महत्त्व आहे. परंतु शेतीमध्ये विचार केला तर बऱ्याचदा विहिरींमध्ये पाणी असते पण वीज वेळेवर उपलब्ध नसल्यामुळे पिकांना पाणी देता येत नाही व त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता वाढते. तसेच शेती करिता जो काही विजेचा पुरवठा होतो तो देखील बऱ्याचदा रात्रीच्या वेळी होत असल्याने शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून रात्री पिकांना पाणी द्यायला जावे लागते व त्यामुळे जीवाला धोका देखील संभवतो.

या सगळ्या दृष्टिकोनातून सौर कृषी पंपाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. शेतकऱ्यांकरिता केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून ज्या काही विविध योजना चालवण्यात येतात त्यामध्ये प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना खूप महत्त्वपूर्ण आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सोलर पंप हे अनुदानावर दिले जातात. याच योजनेच्या बाबतीत एक महत्त्वाचे अपडेट सध्या समोर आली आहे.

 पंतप्रधान कुसुम सोलर पंप योजनेच्या लाभार्थ्यांना सेल्फ सर्वेचे मेसेज सुरू

 महाराष्ट्राचा विचार केला तर अनेक शेतकऱ्यांनी या योजनेच्या माध्यमातून सोलर कृषी पंपंकरिता अर्ज केले आहेत. त्यामुळे ज्या  लाभार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत त्यांना सेल्फ सर्वे चे मेसेज आता येऊ लागले आहेत. अशा लाभार्थ्यांना आता सेल्फ सर्वेचा पर्याय उपलब्ध झाला असून  लाभार्थ्यांना हा सर्वे ऑनलाइन पद्धतीने करता येणे शक्य आहे.

हा सर्वे ऑनलाईन पद्धतीने करण्याकरिता तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये जे काही प्लेस्टोर असते त्यावरून महाऊर्जेचे मेडा नावाच्या ऐप डाउनलोड करणे गरजेचे आहे. या ॲप्लिकेशन चे महत्व म्हणजे हे कुसुम ब लाभार्थ्यांकरिता आहे.या मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ज्या लाभार्थ्यांना संदेश आले आहेत अशांनी सेल्फ सर्वेच्या ऑप्शनवर हा सर्वे पूर्ण करणे गरजेचे आहे.

 या योजनेत किती एकर क्षेत्रासाठी किती क्षमतेचा मिळतो पंप?

एखाद्या शेतकऱ्याकडे जर अडीच एकर क्षेत्र असेल तर त्याला तीन एचपीचा सोलर पंप मिळतो व पाच एकर जमीन असलेल्या शेतकऱ्याला पाच एचपीचा व त्याहून जास्त जमीन असेल तर अशा शेतकऱ्यांना साडेसात एचपी डीसी पंप मिळतो. जर यामध्ये साडेसात एचपी पेक्षा जास्त क्षमतेचा पंप जर शेतकऱ्याला घ्यायचा असेल तर या योजनेच्या माध्यमातून फक्त साडेसात एचपी पर्यंतचे अनुदान किंवा खर्च देण्यात येतो. बाकीचा सर्व खर्च हा शेतकऱ्याला स्वतः करावा लागतो.

English Summary: Have you also applied in PM Kusum Yojna? Read Important Updates
Published on: 08 August 2023, 08:58 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)