हवामान विभागाने या आठवड्याचा अंदाज जाहीर केला असून राज्यात 25 जून ते एक जुलै दरम्यान कोकण, घाटमाथा, उत्तर मध्य महाराष्ट्रात या जिल्ह्यात पाऊस सरासरीपेक्षा कमीपडण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच अहमदनगर, पुणे, सातारा, सांगलीसह मराठवाडा व विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल अशी शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे. तसेच 2 जुलै ते आठ जुलै दरम्यान मराठवाड्यासह विदर्भात सरासरीपेक्षा अधिक आणि उर्वरित महाराष्ट्रात सरासरी ते सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
सध्याची परिस्थिती ही चांगल्या पावसासाठी पोषक नाही, त्यामुळे राज्याच्या अनेक ठिकाणी हलक्या पाऊस तर काही ठिकाणी मध्यम पाऊस पडत आहे. राज्यात जेव्हा मान्सून दाखल झाला तेव्हा कोकण आणि विदर्भात जोरदार पाऊस झाला होता. मात्र राज्याच्या उर्वरित भागात कमी-अधिक स्वरूपात पाऊस पडला. येत्या पुढील आठवड्यात राज्यात पुन्हा पावसाला पोषक वातावरण तयार होऊन पावसाला सुरुवात होईल तसेच उत्तर महाराष्ट्र वगळता उर्वरित महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच कोकण व राज्याच्या उत्तर भागात पाऊस सरासरीपेक्षा कमी राहील.
मान्सूनची वाटचाल मंदावली
यावर्षी तीन जून रोजी केरळमध्ये दाखल झालेला मान्सून काही दिवसातच जलद गतीने देशाच्या बऱ्याच भागात पोहोचला होता. परंतु पुरेशा अनुकूल वातावरणीय परिस्थिती अभावी राजधानी दिल्लीसह वायव्य भारतात मान्सूनची वाटचाल थांबले आहे. या भागांमध्ये मान्सून दाखल होण्यासाठी अजून वाट पाहावी लागणार आहे.
या जिल्ह्यांमध्ये होऊ शकतो जोरदार पाऊस
1 -रविवार :अकोला,अमरावती,भंडारा,नागपूर,वर्धा,यवतमाळ, वाशिम, चंद्रपूर
2- सोमवार : गडचिरोली, गोंदिया
3- मंगळवार : गडचिरोली, गोंदिया
Published on: 27 June 2021, 01:36 IST