यंदा मान्सूनने देशातील अनेक भागात दरवर्षीपेक्षा लवकर आगमन केले होते. जवळ जवळ आठ जुलै पर्यंत मान्सून सर्व देश व्यापेल अशी शक्यता असते. परंतु दिल्लीसह राजस्थानमधील काही भागात अजूनही मान्सून पोहोचला नाही. यंदा मान्सूनने देशातील अनेक भागात दरवर्षीपेक्षा लवकर आगमन केले होते. जवळ जवळ आठ जुलै पर्यंत मान्सून सर्व देश व्यापेल अशी शक्यता असते. परंतु दिल्लीसह राजस्थानमधील काही भागात अजूनही मान्सून पोहोचला नाही.
अजूनही दहा जुलै पर्यंत मान्सूनच्या स्थितीत प्रगती होण्याची कुठल्याही प्रकारची शक्यता नसल्याचे हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले. सध्या जून महिना गेला तरी मान्सून मध्ये मोठ्या प्रमाणात खंड पाहायला मिळाला. परंतु जुलै महिन्यात त्याची परत सर्वसाधारण पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने जाहीर केला आहे त्याच बरोबर पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आले आहे.
शेतीचा पेरणीचा काळ हा जून महिन्यात असतो परंतु पुरेशा पावसाअभावी पेरण्या ना हवा तसा वेग आला नाही. आता चांगल्या पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे.महाराष्ट्राचा विचार केला तर जुलै महिन्यात कोकण, मध्य महाराष्ट्रात सरासरीइतका पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच उत्तर महाराष्ट्र, विदर्भातील दक्षिणेकडील भाग तसेच मराठवाड्यातील तेलंगणाला लागून असलेल्या भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्र व विदर्भातील पूर्वेकडील भागात जुलै महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राचा विचार केला तर पावसाने उघडीप दिल्याने राज्यातील खरीप हंगामाच्या पेरण्या थांबले आहेत. एकूण खरीप क्षेत्राच्या फक्त 16 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. आता पेरणीसाठी शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. पेरणीचा विचार केला तर जमिनीत पुरेशी ओल असेल तर पेरणी केली जाते. राज्याचे खरिपाची एकूण क्षेत्र 142 लाख हेक्टर आहे त्यापैकी 22 लाख 75 हजार हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. हे प्रमाण अवघे 16.2 टक्के इतकेच आहे. जर मागच्या वर्षाचा विचार केला तर मागच्या वर्षी या दिवसात 59 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या होत्या व हे क्षेत्र 42% होते.
Published on: 02 July 2021, 10:52 IST