News

हरियाणा मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे जर फळांचे, भाजीपाल्याचे आणि मसाल्यांचे नुकसान झाले तर 15 ते 40 हजार रुपये प्रति एकर नुकसान भरपाई मिळेल.

Updated on 06 April, 2022 8:49 AM IST

हरियाणा मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे जर फळांचे, भाजीपाल्याचे आणि मसाल्यांचे नुकसान झाले तर 15 ते 40 हजार रुपये प्रति एकर नुकसान भरपाई मिळेल.

या योजनेमध्ये एकवीस फळे, भाजीपाला वर्गीय पिके आणि मसाला पीक यांचा समावेश आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान भरपाईला सरकारने चार वर्गात विभागणी केली आहे. गुरुवारी कृषिमंत्री जेपी दलाल  यांनी मुख्यमंत्री बागवानी विमा योजना या नावाने एक बागवानी पिक विमा योजना पोर्टल ची सुरुवात केली. या पोर्टलच्या माध्यमातून प्रतिकूल  हवामान आणि नैसर्गिक आपत्ती यांच्यामुळे पिकांचे होणारे नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दिली जाईल.

नक्की वाचा:अपघातात मृत्यू झाल्यास शेतकऱ्यांच्या घरच्यांना मिळतात २ लाख, योजनेमुळे अनेक शेतकऱ्यांची कुटूंब सावरली..

ओला दुष्काळ, तापमान, पूरस्थिती, ढगफुटी, बंधाऱ्यांचे फुटणे, वादळी वारे व आगीत होणारे पिकांचे नुकसानीचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. टोमॅटो, कांदे, बटाटे, फुलकोबी, मटर, कारले, वांगे, हिरवी मिरची, शिमला मिरची, फुलकोबी, मुळा, हळद आणि लसूण तसेच फळ पिकांमध्ये पाच पिकांचा समावेश या योजनेत करण्यात आला असून या पिकांना नुकसान भरपाई दिली जाईल.

याबाबत बोलताना दलाल यांनी सांगितले की, ज्या शेतकऱ्यांनी मेरी फसल मेरा ब्योरा यामध्ये रजिस्ट्रेशन केले आहे अशा शेतकऱ्यांसाठी ही योजना वैकल्पिक राहील. या योजनेच्या माध्यमातून भाजीपाला व मसाला पिकांच्या नुकसान भरपाईपोटी तीस हजार रुपये प्रती एकर, फळांच्या नुकसानीसाठी चाळीस हजार रुपये प्रतिएकर दिले जातील. यामध्ये शेतकऱ्यांचा हिस्सा फक्त अडीच टक्के इतका राहील.

नक्की वाचा:केव्हीकेचे उद्दिष्ट माती परीक्षणच महत्व

या नुकसान भरपाई ला चार श्रेणीमध्ये म्हणजे 25, 50, 75 व 100 मध्य विभागण्यात आले आहे. 26 ते 50 टक्के जर नुकसान भरपाई झाली तर नुकसान भरपाई 50 टक्के या दराने भाजीपाला, मसाल्याची पिके यांच्यासाठी पंधरा हजार रुपये, फळपिकांसाठी वीस हजार रुपये तसेच 51 ते 75 टक्के नुकसान झाले तर 75 टक्के दराने म्हणजेच भाजीपाला, मसाल्यांच्या पिकांसाठी 22 हजार पाचशे रुपये प्रति एकर, फळपिकांसाठी 

तीस हजार रुपये प्रती एकर आणि 75 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नुकसान झाले तर शंभर टक्के दराने भाजीपाला व मसाल्याच्या पिकांसाठी तीस हजार रुपये, फळपिकांसाठी चाळीस हजार रुपये दिले जातील. या योजनेच्या कार्यवाहीसाठी प्राथमिक स्वरूपात दहा कोटी रुपयांची व्यवस्था केली गेली आहे. हे नुकसान भरपाई सर्वेक्षणाच्या आधारावर दिली जाईल.

English Summary: haryana goverment start mukhyamantri bagvaani bima yojana
Published on: 06 April 2022, 08:49 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)