प्रत्येकजण काही ना काही स्वप्न उराशी बाळगून आयुष्याची वाटचाल करत असतो. मात्र ही वाटचाल करत असताना ९० टक्के लोक आपल्या आयुष्यात किती अडचणी आहेत आणि मला माझे स्वप्न का साकार करता आले नाही, या सबबी सांगतो. परंतू सोलापूर जिह्यातील शेतकऱ्याच्या लेकीने या सगळ्या अडचणींवर मात करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे
करमाळा तालुक्यातील कुगावच्या सारिका नारायण मारकड या विद्यार्थिनीने हा पराक्रम करून दाखवला आहे. सारिकाची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली असुन प्रतिकूल परिस्थितीत तिने मिळवलेल्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. सारिकाचे प्राथमिक शिक्षणगावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत झाले. तर माध्यमिक शिक्षण चिखलठाण येथील रामबाई बाबूलाल सुराणा विद्यालयात झाले. करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात सारिकाने महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं.
शिक्षक होण्याची तिची इच्छा असल्याने पुणे येथे जाऊन डीएडचा अभ्यासक्रम पुर्ण केला. मात्र डीएडचे शिक्षण घेत असताना तिला स्पर्धा परीक्षेविषयी माहिती मिळाली आणि प्रशासकीय सेवेत दाखल होण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. मुक्त विद्यापीठातून राज्यशास्त्र विषयात पदवी संपादन करून कोल्हापूर येथे स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी जाण्याचा निर्णय सारिकाने घेतला. मात्र एकत्र कुटुंब पद्धतीत तिला पुढील शिक्षणास विरोध देखील झाला. पण मुलीने शिकून मोठे व्हावे अशी आईची इच्छा होती.
त्यामुळे घरच्यांच्या इतर विरोधाला झुगारून कोल्हापूर येथे जाऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. २०१८ साली तिने पूर्ण तयारीनिशी स्पर्धा परीक्षा देऊन सुद्धा तिला यश आले नाही. तर अपयशाने नैराश्येच्या गर्तेत जाऊन स्पर्धा परिक्षेचा अभ्यास सोडून सारिका गावाकडे आली. परंतू आईंने आधार देत समजावून सांगितल्याने पुन्हा प्रयत्न करण्याची प्रेरणा सारिकाला मिळाली. यावर पुन्हा पुणे शहारत खासगी शिकवणी वर्गातून मार्गदर्शन घेत जोमाने तयारी करून सारिकाने अखेर यशाला गवसणी घातली.
जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जीवावर तिला पोलिस उपनिरीक्षक परिक्षेत राज्यातून ३५ वा येण्याचा मान मिळाला आहे. अशिक्षित आणि जेमतेम शिक्षण झालेल्या आणि कोणीही मार्गदर्शक नसलेल्या कुटुंबातून तिने हे यश संपादन केल्याने आई-वडिलांसह नातेवाईकांच्या आनंदाला पारावर उरला नाही. सेवेत दाखल झाल्यानंतर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्याला मदत करण्याचा प्रयत्न राहील अशी भावना तिने व्यक्त केली. शिवाय सर्वच पालकांनी मुलांबरोबरच मुलींनाही शिक्षण दिले पाहिजे, अशी इच्छाही व्यक्त केली.
महात्वाचय बातम्या;
आख्ख मार्केट आता आपलंय!! बीडच्या शेतकऱ्यानं मार्केटच ताब्यात घेतल, लाखोंचा फायदा..
मोठी बातमी! चीनमध्ये कोरोना संसर्गामुळे हाहाकार, पुन्हा लॉकडाऊन लागू
शेतकऱ्यांनो पंजाब डख यांनी केलेला पावसाविषयी अंदाज वाचा, शेतीच्या कामाबाबत आहे फायद्याचे..
Published on: 28 March 2022, 02:53 IST