ज्या पिकांना भौगोलिक मानांकन प्राप्त होते त्या पिकांची एक वेगळीच ओळख निर्माण होते. पिकांच्या गुणांमुळे तसेच त्यांची वैशिष्ट्य यामुळे एक वेगळा दर्जा निर्माण झालेला असतो आणि त्याचवरून पिकांना दर्जा ही मिळतो. परंतु काळाच्या बदलानुसार कोणत्याही पिकांना आजकाल भौगोलिक मानांकन भेटत आहे. मागील काही दिवसांपूर्वी मुंबई मध्ये असे काही प्रकार आढळताना दिसत होते. मात्र आता बाजारात फक्त हापूस जे की जीआय मानांकन भेटलेल्या हापूस आंब्यालाच महत्व राहणार आहे. जीआय मानांकन असल्यामुळे याचा फायदा हापूस बागायतदार वर्गाला भेटणार तर आहेच पण सोबतच हापूस ची चव ग्राहकांना सुद्धा चाखायला मिळणार आहे. मात्र ग्राहक याचा लाभ कसा घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. इनोटेरा कंपनीच्या माध्यमातून देवगज आंबा उत्पादक संघाने हा उपक्रम राबिवला आहे.
खरेदी केंद्रावरच होणार खरेदी :-
जीआय मानांकन भेटलेला हापूस आंबा ग्राहकांना ओळखता यावा म्हणून खरेदी केंद्र उभारली जाणार आहेत. जे की या केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपला हापूस आंबा विकत येणार आहे. फक्त केंद्र उभारणी करूनच नाही तर यासाठी क्यूआर कोड चा देखील वापर होणार आहे जे की यावरून खर्च समजणार आहे की नक्की आंब्याला जीआय मानांकन भेटला आहे का? तसेच मालकाचे नाव, शेत आणि गावचे नाव ही माहिती सुद्धा यावरून समजणार आहे. हापूस आंब्याच्या पेटीवर पत्र लावण्यात येणार आहे जे की यामुळे हापूस आंब्याच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक होणार नाही.
प्रतवारीनंतरच होणार खरेदी :-
जी हापूस आंब्यासाठी केंद्र उभारण्यात येणार आहेत त्या केंद्रात आंब्याचा दर्जा तपासला जाणार आहे जे की यासाठी स्कॅनर चा वापर करण्यात येणार आहे. स्कॅनरमुळे आंब्यात असणारे साक्याचे प्रमाण समजणार आहे. आंब्याची तपासणी झाल्यानंतर एका ब्रँडखाली हे आंबे विकले जाणार आहेत जे की याचा फायदा हापूस आंबा उत्पादकांना होणार आहे आणि संबंधित कंपन्यांना देखील होणार आहे. यामुळे हापूस आंब्याच्या नावाखाली जी ग्राहकांची फसवणूक केली जात होती त्या फसवणुकीवर आळा बसणार आहे असे कृषितज्ञ रामेश्वर चंडक यांनी म्हणले आहे.
देवगड तालुक्यात 11 खरेदी केंद्र :-
जीआय मानांकन भेटलेल्या आंब्याची विक्री करता यावी म्हणून ११ ठिकाणी केंद्र उभारणी केली जाणार आहे. जास्त करून गावाच्या ठिकाणी ही केंद्र उभारण्यात येणार आहेत. असे केल्याने शेतकऱ्यांच्या वाहतुकीचा खर्च वाचणार आहे तसेच हापूस आंबा उत्पादक शेतकऱ्याना याचा फायदा होणार आहे. हापूस ला चांगला दर भेटेल अशी आशा शेतकऱ्यांच्या ध्यानीमनी आहे.
Published on: 01 March 2022, 05:47 IST