हिंवाळा चालू झाला की ओढ लागते तो आंब्याची (mango) आणि त्यामध्ये कोकणच्या हापूस ला तर वेगळाच दर्जा. ग्राहकांचा आवडत आणि बागायतदारांचा आर्थिक दृष्टीने महत्वाचा असणारा हा हापूस मागील दोन वर्षांपासून नैसर्गिक संकट झेलत आहे.यंदा पाऊसामुळे खरीप हंगामातील पिकांचे तसेच फळबागांचे नुकसान झाले आणि याचाच परिणाम हापूस वर झाला आहे. यंदा हापूसचा हंगाम फक्त ३ महिने चालणार आहे.आंब्याला मोहर लागण्याच्या दरम्यान आणि पिकांची काढणी करण्याच्या दरम्यान अवकाळी पाऊसाने हजेरी लावली यामुळे दोन्ही पिकांचे नुकसान झाले. आंब्याचा मोहर लागताच पाऊस पडळाने मोहर गळाला गेला त्यामुळे आंब्याच्या उत्पादनात घट होणार आहे बाजारात आवकही कमी होणार आहे.
गतवर्षी कोरोना तर यंदा अवकाळी:-
शेतीमधून उत्पादन जास्त निघावे म्हणून शेतकरी काही न काही नवीन प्रयोग करत असतो मात्र निसर्गाची साथ आणि बाजारपेठेतील असमतोलपणा असल्याने उत्पादन निघत नाही. मागील वर्षी कोरोनामुळे आंब्याची उलाढाल जवळपास १५० कोटी रुपयांची कमी झालेली होती. एप्रिल पर्यंत जर सतत हापूस ची आवक राहिली तर ३५० कोटी पेक्षा जास्त उलाढाल होऊ शकते.
अवकाळीमुळे 30 कोटींचे नुकसान:-
सतत पडलेला मुसळधार पाऊस आणि मागील दिवसांपूर्वी पडलेला अवकाळी पाऊस त्यामुळे हापूस च्या सुरुवातीस शेतकऱ्यांची हाती काहीच नाही लागले. त्यामुळे हापूस दाखल होण्यास वेळ लागणार आहे व शेतकऱ्यांना कोटी रुपयांचा फटका बसणार आहे. जर वेळेत बागांची खरेदी झाली नाही तर कोकण विभागातील आंबा उत्पादक शेतकऱ्यानं जवळपास ३० कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागेल.
आता सर्वकाही उत्पादन आणि दरावर:-
ज्याप्रमाने आंबा उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती उत्पादनावर राहणार आहे तशीच स्थिती व्यापारी वर्गाची होणार आहे. कारण मोठ्या मोठ्या व्यपाऱ्यांनी २२५ पेक्षा जास्त बाग विकत घेतल्या आहेत.आणि त्यानंतर अवकाळी पाऊस पडला त्यामुळे बागांवर किडीचा आणि रोगराईचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून औषधे फवरण्यात आली. २५ एकराच्या बागेला औषध फवारणी करण्यासाठी ७० हजार रुपये खर्च आला. त्यामुळे आता उत्पादनावर सर्व आकडेवारी ठरणार आहे.
Published on: 28 November 2021, 09:05 IST