News

यंदा अवकाळी मुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. जवळपास सर्वच पिकांना अवकाळी चा फटका बसला आहे, पण सर्वात जास्त फटका हा फळबाग पिकांना बसला आहे. अवकाळी मुळे व त्यानंतर तयार झालेल्या वातावरणामुळे आंबाच्या बागांची मोठी हानी झाली आहे. सकाळी मुळे आंब्यावर प्रामुख्याने करपा रोगाचे सावट बघायला मिळाले. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे असे म्हणणे होते की या वर्षी उत्पादनात कमालीची घट बघायला मिळेल, शिवाय आंबा काढणीसाठी उशिर होईल. परंतु आता फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा हापूस आंब्याची आवक बाजारात बघायला मिळत आहे, वाशीच्या सुप्रसिद्ध एपीएमसी मार्केट मध्ये हापूस आंब्याची हजेरी बघायला मिळाली.

Updated on 02 January, 2022 7:47 PM IST

आम्ही आपणास सांगू इच्छितो की दरवर्षी हापूस आंब्याची आवक ही फेब्रुवारी महिन्यात सुरू होते, पण यंदा मात्र दोन महिने अगोदरच हापूस आंब्याची आवक बघायला मिळत आहे. दरवर्षी कोकणातून मोठ्या प्रमाणात हापूस आंब्याची आवक वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये बघायला मिळते. सालाबादाप्रमाणे यंदाही एपीएमसीमध्ये हापूस आंब्याची हजेरी लागली, पण हापूस आंबा तब्बल दोन महिने अगोदर बाजारात दाखल झाल्याने हा चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. एपीएमसीमध्ये कोकणाच्या देवगढ येथून हापूस आंबा विक्रीसाठी आणला जात आहे. यामुळे आता हापूस आंब्याच्या चाहत्यांना हापूसचा स्वाद घेण्यासाठी फेब्रुवारी महिन्याची वाट बघावी लागणार नाहीय, हापुस आंब्याच्या तीन पेट्या एपीएमसी मध्ये दाखल झाल्या आहेत, आंबा खरेदी करणारे व्यापारी यांच्या मते हापूसला दोन हजार ते पाच हजार प्रति पेटी  दर हा मिळू शकतो.

लॉकडाउन मुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे झाले होते मोठे नुकसान

दरवर्षी एपीएमसी मध्ये हापूस आंबा हा साधारणतः फेब्रुवारी महिन्यातच चमकतो, त्यानंतर हापूस आंब्याची खरी आवक ही मार्च एप्रिल मे या महिन्यात जास्त बघायला मिळते. परंतु यावर्षी नेमक्या याच काळात राज्यात लोक डाऊन ची घोषणा करण्यात आली होती, त्यामुळे हापूस आंबा बाजारात दाखल होऊ शकला नव्हता. या बदललेल्या परिस्थितीमुळे यावर्षी आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.

यावर्षी मात्र हापूस आंबा वेळेच्या अगोदरच बाजारात दाखल झाला आहे, असे असले तरी अवकाळी मुळे आंब्याच्या बागांना मोठा फटका बसला आहे आणि उत्पादनात कमालीची घट होण्याची आशंका व्यक्त करण्यात येत आहे. एपीएमसीमध्ये जरी हापूस आंब्याच्या तीन पेट्या दाखल झाल्या असल्या तरी आंब्याचे सीजन हे अजून लांबणीवरच आहे.

English Summary: hapus mango arrives in apmc market
Published on: 23 December 2021, 01:53 IST