News

'सबसे बडी योद्धा माँ होती हैं !' KGF मधल्या रॉकीचा हा डायलॉग ऐकल्यानंतर आई काय करु शकते याची जाणीव आपल्याला होते. 'आई' या दोन शब्दांभोवती आपले संपूर्ण विश्व फिरत असते. बाहेरून घरात आल्यावर आपल्या नजरा ज्या व्यक्तीला शोधत असतात ती व्यक्ती म्हणजे 'आई'.

Updated on 08 May, 2022 4:35 PM IST

'सबसे बडी योद्धा माँ होती हैं !' KGF मधल्या रॉकीचा हा डायलॉग ऐकल्यानंतर आई (Mother) काय करु शकते याची जाणीव आपल्याला होते. 'आई' या दोन शब्दांभोवती आपले संपूर्ण विश्व फिरत असते. बाहेरून घरात आल्यावर आपल्या नजरा ज्या व्यक्तीला शोधत असतात ती व्यक्ती म्हणजे 'आई'. आपल्याला होणाऱ्या वेदना, आनंद या सर्वाची चाहूल तीला आधीच झालेली असते. Happy Mother's Day 2022

आई (Mother) या शब्दाची फोड केली तर 'आ 'म्हणजे आत्मा आणि 'ई' म्हणजे ईश्वर, असा त्याचा अर्थ निघतो. असे म्हणतात की ईश्वर या जगात सर्वत्र येऊ शकत नाही म्हणून त्याने आईची निर्मिती केली. आपल्या आईबद्दल आदर, प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे मातृदिन (Mother’s Day 2022).

अमेरिकेतील 28 वे राष्ट्राध्यक्ष थॉमस वूडरॉ विल्सन यांनी 8 मे 1914 रोजी मे महिन्यातील दुसरा रविवार अधिकृतपणे मातृदिन म्हणून जाहीर केला. तेव्हा पासून दरवर्षी मे महिन्यातील दुसरा रविवार मातृदिन म्हणून साजरा केला जातो. यंदा 8 मे हा मातृदिन साजरा केला जातो.

खत टंचाईवर रामबाण उपाय; एकदा वाचाच...

दिला जन्म तू विश्व हे दाविलेस

किती कष्ट माये सुखे साहिलेस,

जिण्यालागी आकार माझ्या दिलास,

तुझ्या वंदितो माउली पाऊलांस!

- ग. दि. माडगूळकर

मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

भारतीय संस्कृतीमध्ये मातेचे स्थान अतिशय उच्च असल्याचे सांगण्यात आलेले आहे. माता ही आपली सर्वश्रेष्ठ गुरु मानली गेली आहे. आईचे आपल्या आयुष्यातील स्थान अगदी अनन्यसाधारण असते. तिचे महत्त्व, महती व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडतात. खरे तर आईला सन्मान देण्यासाठी कुठला एक खास दिवस कशाला पाहिजे? ती तर दररोज सन्माननीय आहे.

English Summary: Happy Mother's Day 2022
Published on: 08 May 2022, 10:01 IST