News

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संत नामदेव हळद मार्केटमध्ये दिनांक ६ म्हणजेच शुक्रवारी हळदीची जवळपास ३२०० क्विंटल आवक झालेली आहे. जे की संत नामदेव हळद मार्केटमध्ये हळद प्रतिक्विंटल मागे किमान ६१५० रुपये दर तर हळदीला प्रतिक्विंटल मागे कमाल ७६५० रुपये दर तर सरासरी प्रतिक्विंटल मागे ६९०० रुपये दर मिळाला आहे अशी माहिती बाजार समितीच्या सचिव नारायण पाटील यांनी दिलेली आहे.

Updated on 09 May, 2022 3:16 PM IST

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संत नामदेव हळद मार्केटमध्ये दिनांक ६ म्हणजेच शुक्रवारी हळदीची जवळपास ३२०० क्विंटल आवक झालेली आहे. जे की संत नामदेव हळद मार्केटमध्ये हळद प्रतिक्विंटल मागे किमान ६१५० रुपये दर तर हळदीला प्रतिक्विंटल मागे कमाल ७६५० रुपये दर तर सरासरी प्रतिक्विंटल मागे ६९०० रुपये दर मिळाला आहे अशी माहिती बाजार समितीच्या सचिव नारायण पाटील यांनी दिलेली आहे.

या जिल्ह्यांमधून होतेय मोठ्या प्रमाणावर हळदीची आवक :-

देशामध्ये सर्वात जास्त प्रसिद्ध असलेल्या हिंगोली येथील हळदीच्या मार्केटमध्ये हिंगोली जिल्हा तसेच त्याच्या शेजारचे जिल्हे जसे की नांदेड जिल्हा, वाशीम जिल्हा, बुलडाणा जिल्हा, यवतमाळ जिल्हा, अमरावती जिल्हा, बीड जिल्हा तसेच अनेक जिल्ह्यांमधून हळदीची मोठ्या प्रमाणात आवक होत असते. या जिल्ह्यांमधून मोठ्या प्रमाणावर हळदीची आवक होत असल्यामुळे आठवड्यातून सोमवार, बुधवार, शुक्रवार या तीन दिवशीच हळदीची मोठ्या प्रमाणावर आवक होते.

प्रतिक्विंटल मागे हळदीला भेटतोय असा दर :-

हिंगोलीच्या हळद मार्केटमध्ये २ तारखेला म्हणजेच मागील सोमवारी ते ६ तारीख म्हणजे शुक्रवारी या ५ दिवसांच्या कालावधीमध्ये हळद या पिकाची जवळपास ११००० क्विंटल आवक झालेली आहे. तर ४ तारखेला म्हणजेच बुधवारी हळदीची जवळपास ३८०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल मागे किमान ६००० ते कमाल ७४२५ रुपये दर भेटलेला आहे. सरासरी हळदीला प्रतिक्विंटल मागे ६७१२ रुपये दर मिळालेला आहे. सोमवारी २ तारखेला हळदीची ४००० क्विंटल आवक झालेली आहे जे की प्रतिक्विंटल मागे हळदीला किमान ६२०० रुपये दर तर कमाल ७५०० रुपये दर मिळालेला आहे. सरासरी हळदीला ६८५० रुपये दर मिळालेला आहे.

हळदीच्या दरामध्ये चढ-उतार सुरूच :-

मागील आठवड्याच्या तुलनेमध्ये हळदीचे दर प्रतिक्विंटलमागे ४०० ते ५०० रुपयांनी कमी झालेले आहेत. गेल्या आठवड्यामध्ये म्हणजेच सोमवारी २५ तारखेला हळदीला प्रतिक्विंटल मागे किमान ६००० रुपये ते कमाल ८००० रुपये तर सरासरी ७००० रुपये दर मिळालेला आहे. मंगळवारी २६ तारखेला हळदीला प्रतिक्विंटल किमान ६८०० तर कमाल ७५८० रुपये तसेच सरासरी ७३०० रुपये असा दर मिळालेला आहे. २९ तारखेला शुक्रवारी हळदीला प्रतिक्विंटल मागे किमान ६६०० रुपये दर तर कमाल ७७११ रुपये तर सरासरी ७१५५ रुपये हळदीला दर भेटलेला आहे. मागील वर्षी २०२१ च्या एप्रिल महिन्यात हळदीला प्रतिक्विंटल मागे सरासरी ७८६५ रुपये दर आणि मी महिन्यामध्ये सरासरी ७०३२ रुपये दर मिळालेला आहे अशी सूत्रांच्या माहितीनुसार समजले आहे.

English Summary: Happiness among turmeric growers! In Hingoli's turmeric market, the price per quintal is around Rs. 6,000 to 7,000
Published on: 09 May 2022, 03:16 IST