महाराष्ट्र राज्यात प्रति वर्षाला जवळपास ३००० मेट्रिक टन रेशीम कोषाचे उत्पादन होते जे की यामध्ये अग्रेसर जिल्हा म्हणजे मराठवाडा नंतर बीड जिल्हा आणि जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्वात जास्त कोष निर्मिती होत असते. मराठवाडा साठी खास बाजारपेठ जालना मध्ये तयार झालेली आहे जे की कर्नाटक राज्यात जसे ऑनलाइन ट्रेंडिंग सुरू आहे तसेच जालना च्या बाजारपेठेत सुद्धा ऑनलाईन ट्रेंडिंग सुरू आहे.जागतिक पातळीवर सर्वात जास्त चीन देशात रेशीम तयार होते जे की रेशीम उद्योगात चीन देश सर्वात जास्त आघाडीवर आहे
प्रति वर्षाला कमीतकमी २५० मेट्रिक टन एवढे उत्पादन :
चीन कडून भारताला रेशीम खरेदी करावे लागते. या परिस्थितीत इतर देशांनी सुद्धा रेशीम उद्योग वाढवण्याचा कल प्रशासनाने घेतलेला आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त रेशीम कोष मराठवाडा मध्ये तयार केला जातो.मराठवाडा मधून सर्वात जास्त कोशाची निर्मिती बीड जिल्ह्यातून होते आणि बीड नंतर जालना जिल्ह्यातील शेतकरी जास्तीत जास्त कोशाचे उत्पादन घेतात. जालना जिल्ह्यात २०११ साली फक्त ४६ असे शेतकरी होते जे कोषाचे उत्पादन घेत होते मात्र आजच्या घडीला पाहायला गेले तर जालना मध्ये जवळपास तीन हजार शेतकरी कोषाचे उत्पादन घेत आहेत. प्रति वर्षाला कमीतकमी २५० मेट्रिक टन एवढे उत्पादन जालना मधील शेतकरी उत्पादन घेत आहेत.
हेही वाचा:निफाडच्या शिरवाडे गावातील डाळिंबाला परदेशात पसंद,चार एकरात चक्क ३५ लाख रुपयांचा नफा
कोष पासून जिल्ह्यात वर्षाला जवळपास दोन ते अडीच कोटींची उलाढाल होत असते. मराठवाडा मध्ये जास्तीत जास्त उत्पादन होत असल्याने ज्या प्रकारे कर्नाटक राज्यात कोष बाजारपेठ आहे त्याच प्रकारे जालना मध्ये सुद्धा कोष बाजारपेठ आहे.रेशीम उद्योगामुळे शेतकरी वर्गाचे नशीबच उघडले गेले आहे जे की यावेळी जालनामध्ये रेशीम उद्योगाला चांगल्या प्रकारे भाव मिळालेला आहे.
जे की प्रति क्विंटल रेशीम कोष ला भाव २५ हजार ते ४५ हजार भाव मिळालेला आहे. पहिल्यांदाच एवढा चांगला भाव मिळाला असल्याने रेशीम उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. ज्यावेळी तेथील काही शेतकऱ्यांची मुलाखत घेण्यात आली त्यावेळी त्यांनी सांगितले की मागील खूप दिवसापासून आम्ही रेशीम कोष उत्पादन घेत आहोत आणि चांगल्या प्रकारे भाव सुद्धा मिळत गेला पण यावेळी जवळपास ४२५ कडे भाव गेल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Published on: 13 September 2021, 08:14 IST