गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे शेतीचे नुकसान होत आहे. सोमवारी इंदापूर तालुक्यात वादळी पावसाने हजेरी लावली होती. यामुळे ज्वारी, मका व द्राक्षाच्या बागा आणि काढलेल्या कांद्याचे नुकसान झाले आहे. मंगळवारीही राज्याच्या अनेक भागांमध्ये पाऊस झाला असून शेती आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.
धुळे जिल्ह्यातील शिरपूर परिसराला याचा सर्वाधिक फटका बसला. वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला तर काही भागांमध्ये गारपीटही झाली. गहू आणि हरभरा पिकांचे नुकसान झाले आहे. फक्त २० मिनिटांच्या पावसामुळे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. या पावसामुळे शिरपूर्चा अनेक भागांमध्ये वीजपुरवठा खंडीत झाला आहे. जालन्यातही वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. अंबड तालुक्यातील साष्ट पिंपळगाव, शहागड परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. मंगळवारच्या संध्याकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरवात झाल्याने परिसरातील नागरीकांची तारांबळ उडाली. अर्धा तास पाऊस झाल्याने परिसरात गारवा पसरला. पण यामुळे आंब्याला आलेला मोहोर गळून पडला. दरम्यान मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात मेघगर्जना, विजांसह, वादळी पावसाची शक्यता आहे.
Published on: 18 March 2020, 10:18 IST