राज्यावर निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा आणि अरबी समुद्र तसेच बंगालच्या उपसागराकडून होणारा बाष्पाचा पुरवठा यामुळे राज्यात १९ ते २१ एप्रिलपर्यंत पावसाची शक्यता आहे. रविवारी राज्यात वादळी वारे वाहण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेने वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील दहा जिल्ह्यांना या वाऱ्याचा फटका बसू शकतो. दरम्यान, राज्यातील काही भागात उन्हाचा तडाखा वाढला आहे. शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील अकोला येथे राज्यातील उच्चांकी ४३.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
शनिवारी अकोला येथे राज्यातील सर्वाधिक ४३.८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. दरम्यान आज उद्या आणि परवा राज्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज असून मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट होण्याची शक्यता आहे. कोकणात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कुलाबा वेधशाळेनुसार, राज्यातील मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, नांदेड, बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांत वादळी वारे वाहण्याची शक्यता ५१ ते ७५% आहे. या जिल्ह्यांत वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किमीपर्यंत राहील, असे वेधशाळेने म्हटले आहे. गारपिटीचीही शक्यता आहे.
Published on: 19 April 2020, 11:47 IST