बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले गुलाब चक्रीवादळ रविवारी आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकले. परंतु आता त्याची तीव्रता कमी होत असून, चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहे.
महाराष्ट्र पार केल्यानंतर हे अरबी समुद्राकडे गेल्यानंतर गुरुवारपर्यंत अभिवादन प्रणाली पुन्हा जोर पकडण्याचे संकेत आहेत. या चक्र वादळाची निर्मिती शनिवारी म्हणजेच 25 तारखेला बंगालच्या उपसागरात झाली. दुसऱ्या दिवशी रविवारी हे वादळ ओडिशा च्या गोपाळपुर, आंध्र प्रदेश मधील कलिंगपट्टनमयेथे धडकले. त्यानंतर या वादळाची तीव्रता कमी होत असून काल सोमवारी या वादळाचेकेंद्र छत्तीसगड मधील जगदलपूर पासून आग्नेय दिशेला 90 किलोमीटर ओरिसाच्या मलंकगिरी पासून ईशान्येकडे 65 किलोमीटर अंतरावर होती. रात्री या चक्रवादळ प्रणालीचे रूपांतर अतितीव्र कमिदाब क्षेत्रात होणार असून ते पश्चिमेकडे महाराष्ट्राकडे सरकत आहे.
महाराष्ट्र साठी आजचा दिवस महत्त्वाचा
गुलाब चक्रीवादळाची तीव्रता कमी होत असली तरी त्या चक्रीवादळाचा प्रभाव आज महाराष्ट्राला जाणवणार आहे. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम विदर्भामध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.त्यामुळे महाराष्ट्रासाठी आजचा दिवस फार महत्वाचा आहे.
30 सप्टेंबर पर्यंत आणखी एक चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता
ते सप्टेंबर पर्यंत हे कमी दाबाचे क्षेत्र गुजरात पर्यंत जाईल. त्यामुळे त्याचा प्रभाव म्हणून गुजरात मध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. हे चक्रीवादळ क्षेत्र अरबी समुद्रात गेल्यानंतर पुन्हा अति तीव्र कमी दाबाचे क्षेत्रात रूपांतर होण्याची शक्यता असल्यामुळे अरबी समुद्रात पुन्हा एक चक्रीवादळ ते सप्टेंबर नंतर तयार होऊ शकतं. परंतु अरबी समुद्रात जर चक्रीवादळ तयार झाले तर त्याचाधोका महाराष्ट्राला नाही.
Published on: 28 September 2021, 01:19 IST