News

स्थानिक अमडापुर येथे कृषी विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या तंत्रज्ञान

Updated on 17 November, 2022 11:54 AM IST

स्थानिक अमडापुर येथे कृषी विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या तंत्रज्ञान पंधरवाड्यानिमित्त शेतकऱ्यांना विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. त्यामध्ये हरबरा बीजप्रक्रिया, वनराई बंधाऱ्याचे महत्व, बीबीएफ लागवड तंत्र्यज्ञान, पौष्टिक तृणधान्य पिकाचे महत्व, पीक बदल पद्धती या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.याप्रसंगी बोलताना कृषी पर्यवेक्षक श्री इंगळे साहेब

यांनी हरबरा या पिकाला पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा बीज प्रक्रिया करावी

चेतावनी शेतकऱ्यांनी लक्षपूर्वक विचारात घेणे गरजेचे

व त्यानंतर 250 ग्रॅम रायझोबियम प्रति 10 किलो बियाण्यास गुळाच्या थंड द्रावणामध्ये मिसळून चोळावे,250 grams of rhizobium per 10 kg of seeds should be mixed with cold solution of jaggery and rubbed. त्यानंतर बियाणे सावलीत सुकवून मगच पेरणी करावी. बीज प्रक्रियेमुळे पिकाचे रोप अवस्थेत बुरशीजन्य रोगापासून संरक्षण होते असे मार्गदर्शन केले.कृषी सहाय्यक श्री पवार साहेब यांनी मृदा व

जलसंधारणामध्ये वनराई बंधाऱ्याचे महत्त्व समजावून सांगताना वनराई बंधाऱ्यामुळे वाहत जाणारे पाणी अडवले जाऊन पाण्याची पातळी वाढते व सोबतच वाहत जाणारी माती अडवली जाऊन जमिनीची धूप थांबवण्यासाठी मदत होते याप्रकारे वनराई बंधाऱ्याचे महत्त्व शेतकऱ्यांना पटवून दिले.कृषी सहाय्यक श्री योगेश सरोदे यांनी पौष्टिक तृणधान्य बद्दलचे महत्त्व अधोरेखित केले तसेच शेतांमध्ये उत्पादन वाढीसाठी राबवण्यात येत

असलेल्या विविध तंत्रज्ञानाविषयी माहिती दिली.सदर कार्यक्रमास अमडापुर चे उपसरपंच अजीस खा, रफिक मेम्बर, श्री पवार, चिम व गावातील प्रगतशील शेतकरी, पत्रकार बांधव व बहुसंख्य शेतकरी उपास्थित होते. कृषी सहाय्यक श्रीमती गवई मॅडम यांनी पुढील खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी सोयाबीनचे बियाणे राखून ठेवावे असे आवाहन केले व उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

English Summary: Guidance to farmers on the occasion of Technology Fortnight through Agriculture Department at Amdapur
Published on: 16 November 2022, 02:24 IST