कीटकांपासून होणाऱ्या लम्पी त्वचा रोग हा गोवंश व महिष वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे.हा आजार जनावरांपासून मानवास संक्रमित होत नाही.‘लम्पी स्कीन’हा पशुधानातील वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार आहे.दि.४ सप्टेंबर रोजी सिंदखेडराजा तालुक्यातील
उमरद येथे जनावरांच्या लंपी स्किन या आजाराबाबत मार्गदर्शन केले Guided about animal lumpy skin disease at Umrad व उपचाराबद्दल माहिती डॉ निकम पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती सिंदखेड राजा यांच्या उपस्थितीत डॉ. विनायक गाडेकर यांनी केले त्यावेळी उमरद गावचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य व गावातील अनेक शेतकरी
उपस्थित होते.या आजाराने पशुधन दगावण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.पण शेतकऱ्यांनी काळजी घेत सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. तसेच आपल्या जनावरांची वेळीच काळजी घेतल्यास आपल्या जनावाराला लम्पी आजारा लागण होण्यापासून वाचविता येईल.
या आजाराची प्रमुख लक्षणे कोणती?आजाराचा संसर्ग झाल्यास प्रथम जनावरांच्या डोळयातून व नाकातून पाणी येते.लसिकाग्रंथीना सूज येते.सुरवातीस ताप येतो.दुधाचे प्रमाण कमी होते.चारा खाणे,पाणी पिणे कमी होते.
हळूहळू डोके,मान,मायांग,कास इ.भागाच्या त्वचेवर 10-50 मिमी व्यासाच्या गाठी प्रामुख्याने येतात.तोंडातील व्रणामुळे आजारी जनावरांना चारा खाण्यास त्रास होतो.डोळ्यातील व्रणामुळे चिपडे येतात.डोळ्यांची दृष्टी बाधित होते.पायावर सूज येवून काही जनावरे लंगडतात.
Published on: 04 September 2022, 07:16 IST