भारताच्या अर्थव्यवस्थेचा विचार केला तर भारताची अर्थव्यवस्था ही कृषिप्रधान अर्थव्यवस्था आहे. भारतातील ग्रामीण भागातील बहुसंख्यलोकसंख्या ही शेती क्षेत्रावर अवलंबून आहे.
परंतु आपल्याला माहीत आहेच की मान्सून आणि शेती या दोन गोष्टींचा घनिष्ठ संबंध आहे. इतकेच नव्हे तर कृषी क्षेत्राचा डोलाराच हा मान्सूनवर उभा आहे. अमुक वर्षी मान्सूनचे प्रमाण कसे राहील यावर शेती क्षेत्राचे भवितव्य अवलंबून असते. शेतीच्या वेळापत्रकच हे मान्सूनच्या वेळापत्रकाप्रमाणे चालते. या लेखामध्ये आपण शेती आणि मान्सून यांचे महत्त्व समजून घेऊ.
नक्की वाचा:खरं काय! शिळी चपाती खाल्ल्याने आपल्या शरीराला मिळतात अनेक आश्चर्यकारक फायदे; वाचा याविषयी
2022 म्हणजे यावर्षी कसा राहील मान्सून?
शेतकऱ्यांमध्ये मान्सून ची परिस्थिती कशी राहील याबद्दल जाणून घेण्याचे कायमच उत्सुकता असते. मान्सूनचे आगमन, त्याची दिशा, तीव्रता, कालावधी आणि मान्सूनची माघार ही प्रत्येक वर्षी सारखी नसते. कधी आगमन लवकर होते तर कधी उशिरा तर कधी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडतो. या सगळ्या मान्सूनच्या एकंदरीत हालचालींवर शेताच्या पिकांचे उत्पादन आणि नुकसान अवलंबून असते. त्यामुळे मान्सूनचा अंदाज जाणून घेणे शेतकऱ्यांसाठी खूपच महत्वाचे असते.
आता चालू वर्षाचा म्हणजेच 2022 या वर्षा बद्दल बोलायचे झाले तर यावर्षी मान्सून हा शेतकऱ्यांना दिलासादायक असा राहणार आहे. कारण अनेक वर्षानंतर मान्सून सामान्य राहू शकतो.
नक्की वाचा:बापरे! एका आंब्याची किंमत पावणे तीन लाख रुपये; आंब्याला दिली जातेय हायटेक सेक्युरिटी
हवामानाचा अंदाज वर्तवणारे स्कायमेट च्या म्हणण्यानुसार, या वर्षी मान्सून सामान्य राहण्याची शक्यता असून यंदा सरासरीच्या 96 ते 104 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. स्कायमेट ने असा देखील म्हटले आहे की मान्सूनचा तपशीलवार अंदाज करण्यासाठी डेटा गोळा करत आहे व यानंतर एप्रिलमध्ये अंदाजाचा तपशीलवार अहवाल जारी करण्यात येईल. आत्ता जो स्काय मेटणे अंदाज वर्तवला आहे हा प्रारंभिक अंदाज आहे. आता जर मान्सूनची स्थिती सामान्य राहिली शेतीमध्ये उत्पादन चांगले होते.
उत्पादन चांगले आले तर सहाजिकच शेतकऱ्यांच्या हातात दोन पैसे खेळते राहतात व शेतकऱ्यांची परिणामी ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत होते. भारताची अर्थव्यवस्था ही ग्रामीण अर्थव्यवस्था देखील आहे त्याच्यामुळे ग्रामीणभारताची अर्थव्यवस्था सुधारली तर भारताच्या एकंदरीत जीडीपीला चांगला फायदा होतो.
Published on: 31 March 2022, 08:41 IST