News

केंद्रीय मंत्रिमंडळाने जाहीर केलेल्या पत्रात म्हटले आहे की, यंदा गव्हाला उत्पादन खर्चावर १०२ टक्के नफ्यासह हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. मोहरीला ९८ टक्के, मसूरला ८९ टक्के, बार्लीला ६० टक्के आणि सूर्यफुलाला ५२ टक्के नफ्यासह हमीभाव जाहीर करण्यात आला आहे.

Updated on 18 October, 2023 4:49 PM IST

New Delhi : केंद्रीय मंत्रिमंडळाने रब्बी हंगाम २०२४-२५ च्या हमीभाव वाढीला मान्यता दिली असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर दिली आहे. एमएसपीमध्ये सर्वाधिक वाढ मसूर साठी ४२५ रुपये प्रति क्विंटलने मंजूर करण्यात आली आहे. त्यानंतर मोहरीसाठी २०० रुपये प्रति क्विंटल, गहू आणि करडईच्या एमएसपीमध्ये प्रत्येकी १५० रुपये प्रति क्विंटल वाढ करण्यात आली आहे. बार्ली आणि हरभऱ्यासाठी एमएसपीमध्ये ११५ रुपये प्रति क्विंटल आणि १०५ रुपये प्रति क्विंटलने वाढ करण्यात आली आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाने जाहीर केलेल्या पत्रात म्हटले आहे की, यंदा गव्हाला उत्पादन खर्चावर १०२ टक्के नफ्यासह हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. मोहरीला ९८ टक्के, मसूरला ८९ टक्के, बार्लीला ६० टक्के आणि सूर्यफुलाला ५२ टक्के नफ्यासह हमीभाव जाहीर करण्यात आला आहे.

पुढे पत्रात म्हटले आहे की, अन्न सुरक्षा वाढवण्यासाठी, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि आयात कमी करण्यासाठी सरकार तेलबिया, कडधान्ये पीक लागवडीसाठी प्रोत्साहन देत आहे. किंमत धोरणाव्यतिरिक्त, सरकारने आर्थिक सहाय्य प्रदान करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (NFSM), प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (PMKSY), राष्ट्रीय तेलबिया आणि तेल पाम (NMOOP) यांसारखे विविध उपक्रम हाती घेतले आहेत. शेतकऱ्यांना तेलबिया आणि कडधान्ये लागवडीसाठी प्रोत्साहित करण्यासाठी दर्जेदार बियाणे देण्यासही सरकार प्रयत्न करत आहे.

हमीभावात केलेली वाढ
पीक - हमीभाव - वाढ
हरभरा - ५४४० - १०५
गहू - २२७५ -१५०
मसूर - ६४२५ -४२५
मोहरी -५६५०- २००
सूर्यफुल -५८००-१५०
बार्ली- १८५०- ११५

English Summary: Guaranteed price MSP of rabbi crops announced Know which crops how much guaranteed
Published on: 18 October 2023, 04:49 IST