News

दिल्ली येथे ६ ते ८ ऑक्टोबर २०२२ रोजी तीन दिवसाचे देशव्यापी एमएसपी गॉरंटी कानून अधिवेशन भरणार आहे. सदर अधिवेशन दिल्ली येथील पंजाब खोड या गावात भरणार असून या अधिवेशनासाठी देशभरातील व महाराष्ट्रातील शेतकरी प्रचंड संख्येने अधिवेशनास जाणार आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी दिल्लीमधील अधिवेशनात सामील होणार आहेत.

Updated on 08 September, 2022 4:43 PM IST

दिल्ली येथे ६ ते ८ ऑक्टोबर २०२२ रोजी तीन दिवसाचे देशव्यापी एमएसपी गॉरंटी कानून अधिवेशन भरणार आहे. सदर अधिवेशन दिल्ली येथील पंजाब खोड या गावात भरणार असून या अधिवेशनासाठी देशभरातील व महाराष्ट्रातील शेतकरी प्रचंड संख्येने अधिवेशनास जाणार आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी दिल्लीमधील अधिवेशनात सामील होणार आहेत.

याबाबत शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी माहिती दिली आहे. राजू शेट्टी म्हणाले, ज्या शेतकऱ्यांना रेल्वेने यायचे आहे, त्या शेतकऱ्यांनी ४ ऑक्टोबर रोजीचे रेल्वेचे तिकीट काढावयाचे आहे. पुणे, मिरज, कोल्हापूर , परभणी, नांदेड, जालना , नाशिक आदी स्टेशनवरून सुटणाऱ्या गाड्यांचे बुकींग प्रत्येकाने स्वतः करून घ्यावे.

दरम्यान, केंद्र सरकारने तीन कृषी कायदे लागू केल्यानंतर या निर्णयाच्या विरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले होते. शेतकऱ्यांनी वर्षभर दिल्लीच्या सिमेवर आंदोलन केलं होतं. या शेतकर्‍यांच्या आंदोलनापुढे नमतं घेत केंद्र सरकारनं तीन कृषी कायदे मागे घेतले होते. ऊसाला केंद्र सरकारने निश्चित केलेली एफआरपी शेतकर्‍यांना देणं कायदेशीररित्या बंधनकारक केलं आहे.

आयकरच्या धाडीनंतर अभिजीत पाटलांचा मोठा निणर्य, २ वर्षापासून थकीत असलेली 30 कोटींची बिलं देण्यास सुरुवात..

आता शेतकर्‍याने उत्पादित केलेल्या प्रत्येक कृषिमालाला सरकारने जाहीर केलेला हमीभाव कायदेशीररित्या मिळावा. तसेच यासाठी हमीभावाचा एक कायदा असावा अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली होती. मात्र, अद्याप ही मागणी केंद्र सरकारनं मंजूर केली नाही. MSP च्या कायद्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटना आता आक्रमक झाल्या आहेत.

शेतकऱ्यांनो लक्ष द्या! आज 'या' जिल्ह्यात अतिवृष्टी होणार! पंजाबरावांचा इशारा...

येत्या दोन दिवसात बुकींग केल्यास कन्फर्म तिकीट मिळेल. तरी ज्या शेतकऱ्यांना दिल्लीमधील अधिवेशानासाठी यायचे आहे, त्यांनी आगाऊ तिकीट बुकींग करून घ्यावे. तसेच विमान तिकीट काढायचे असेल तर मध्यवर्ती कार्यालयास संपर्क साधावे. संघटनेच्या प्रमुख पदाधिकार्यांना हजर राहणे बंधनकारक आहे तसेच अधिवेशन स्थळी राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. संपर्क- स्वाभिमानी शेतकरी संघटना, मध्यवर्ती कार्यालय, जयसिंगपूर
मो. ९९७५०९३०८८

याबाबत शेट्टी यांनी फेसबुक पोस्ट करून माहिती दिली आहे. MSP च्या कायद्यासाठी शेतकरी आग्रही आहेत. यामुळे हमीभावाच्या मुद्द्यावरुन विविध शेतकरी संघटना पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी दिल्लीमधील अधिवेशनात सामील होणे गरजेचे असल्याचे शेट्टींनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या;
कास पठारावरील फुलांचा हंगाम 10 सप्टेंबरपासून सुरू, पर्यटक खुश
Electric Scooter: स्वस्तात 120KM रेंज देणाऱ्या दोन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च, किंमतही बजेटमध्ये..
Onion News: कांदा विक्रीप्रकरणी मोदी सरकारने उचलले मोठे पाऊल! शेतकऱ्यांना दिलासा मिळणार?

English Summary: Guaranteed Price Act, country's Farmers Maidan Delhi, Raju Shetty tickets
Published on: 08 September 2022, 04:43 IST