News

जळगावमध्ये (Jalgaon) 'सावदा' इथं पहिली राज्यस्तरीय केळी पिक परिषद पार पडली. महाराष्ट्र राज्य केळी उत्पादक शेतकरी संघाच्या वतीनं या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थित होते. पहिल्या राज्यस्तरीय केळी पिक परिषदेत 19 शेतकऱ्यांना 2023 चा केळीरत्न पुरस्कार देण्यात आला.

Updated on 25 April, 2023 10:23 AM IST

जळगावमध्ये (Jalgaon) 'सावदा' इथं पहिली राज्यस्तरीय केळी पिक परिषद पार पडली. महाराष्ट्र राज्य केळी उत्पादक शेतकरी संघाच्या वतीनं या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थित होते. पहिल्या राज्यस्तरीय केळी पिक परिषदेत 19 शेतकऱ्यांना 2023 चा केळीरत्न पुरस्कार देण्यात आला.

ज्या शेतकऱ्यांनी एकरी केळीचे 30 टनापेक्षा अधिक उत्पादन घेतलं आहे, त्या शेतकऱ्यांना केळीरत्न पुरस्कार देण्यात आला. यामध्ये केळीला केळीला प्रतिकिलो 18 रुपये 90 पैसे हमीभाव देण्यात यावा या प्रमुख मागणीसह केळीचा शालेय पोषण आहारात समावेश करावा अशी मागणी करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य केळी उत्पादक शेतकरी संघाचे अध्यक्ष किरण चव्हाण यांनी केली.

शेतकऱ्यांना सातत्यानं विविध संकटांचा सामना करावा लागतो. अवकाळी पाऊस, गारपीट, बोगस खते, निकृष्ट प्रतिची रोपे, बोगस खते याचबरोबर विमा कंपन्या आणि व्यापाऱ्यांनी चालवलेली शेतकऱ्यांची पिळवणूक याचा सामना केळी उत्पादक शेतकऱ्यांना करावा लागत आहे. या सर्व मुद्यांवर या परिषदेत चर्चा झाली.

देशात दिवसभरात 10,112 कोरोना रुग्ण, 29 मृत्यू; गेल्या महिन्याच्या तुलनेत मोठी वाढ..

केळी पिकाला पाहिजे तसा हमीभाव मिळत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांनी केळीसाठी केलेला खर्च देखील निघत नसल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. केळीच्या पिकांसाठी मोठा खर्च करावा लागत असल्याची माहिती किरण चव्हाण यांनी दिली.

इंदापूर तालुक्यातील शेतकरी कपिल जाचक, गणेश कदम (पंढरपूर), किशोर राणे (यावल जळगाव), यश नराजे (तेल्हारा अकोला), विजय कोकरे (करमाळा), सुमण रणदिवे (पंढरपूर), धिरज पाटील (सोयगाव, संभाजीनगर), अभिजीत पाटील (करमाळा), शिवशंकर कोरडे (तेल्हारा अकोला), नागेश चोपडे (अंदापूर), लक्ष्मण सावळे (रावेर), दत्तात्रय सजे (अहमदनगर) यांना पुरस्कार देण्यात आला.

Onion Subsidy : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा, राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय..

तसेच कन्हैय्या महाजन (रावेर), अतुल जावळे (यावल जळगाव), विजय पाटील (जळगाव), उत्तम पाटील (जळगाव)भालचंद्र पाटील (जळगाव), दिनेश आढाव (संग्रामपूर बुलढाणा), माणिक पाटील (जळगाव) या 19 शेतकऱ्यांना केळीरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. आहे.

केळीचा शालेय पोषण आहारामध्ये समावेश करण्यात यावा. केळीला 18 रुपये 90 पैसे असा हमीभाव मिळावा. विमा कंपन्यांची मनमानी थांबूवून शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा. प्रतिबंधित असणारी औषधे, तसेच खते यापुढे कुठल्याही कृषी केंद्रामध्ये विक्रीसाठी ठेवल्यास कृषी अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल, असे ठराव करण्यात आले आहेत.

या चॉकलेटने जनावरांना दूध देण्याची क्षमता वाढते, जाणून घ्या काय आहे खासियत
या महिन्यात करा खरबुजाची लागवड, 80 ते 100 दिवसात कमवा चांगला नफा..
मधमाशीपेक्षा ३ पट अधिक मध देते ही मधमाशी, सरकारकडून 85 टक्के अनुदान..

English Summary: Guarantee price of banana Rs 18 90 per kg, resolution approved
Published on: 25 April 2023, 10:23 IST