News

बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन अर्थात स्मार्ट प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकरी कंपन्यांनी महिला सभासदांना पूर्णता सहभागी करून पारदर्शकपणे व्यवहार करावेत आणि मूल्य साखळी वाढवण्यासाठी जोरदार प्रयत्न करावे, असे प्रतिपादन कृषी मंत्री दादा भुसे यांनी केले.

Updated on 22 December, 2021 2:50 PM IST

बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन अर्थात स्मार्ट  प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकरी कंपन्यांनी महिला सभासदांना पूर्णता सहभागी करून पारदर्शकपणे व्यवहार करावेत आणि मूल्य साखळी वाढवण्यासाठी जोरदार प्रयत्न करावे, असे प्रतिपादन कृषी मंत्री दादा भुसे यांनी केले.

स्मार्ट प्रकल्पाच्या अंतर्गत अल्पबचत भवन येथे आयोजित अहमदनगर, पुणे व सोलापूर येथील प्रथम टप्प्यात मंजुर शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या कार्यशाळेत ते बोलत होते. या कार्यशाळेला कृषी आयुक्त तथा प्रकल्प संचालक धीरज कुमार देखील उपस्थित होते. यावेळी बोलताना कृषिमंत्री म्हणाले की,शेतमालावर प्रक्रिया करून त्याचे मूल्य वाढवण्यावर भर देणे आवश्यक आहे तसेच शेतमालाची गुणवत्ता वाढवण्याची देखील गरज आहे.जागतिक बॅंकेच्या अर्थसाहाय्याने हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या हितासाठी राबवण्यात येत आहे.

शेतकरी कंपन्यांनी तो यशस्वी केल्यास इतर शेतकऱ्यांनाही त्यामाध्यमातून प्रेरणा मिळेल व प्रकल्पातून मिळणारा लाभ हा शेवटचा शेतकऱ्यांपर्यंत जाईल याची दक्षता घ्यावी आणि प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत या योजनेची माहिती पोहोचवावी, असे आवाहन त्यांनी केले.

ते बोलताना पुढे म्हणाले की एकेकाळी देशाला महाराष्ट्राने सहकाराचीसंकल्पना दिली. सहकार क्षेत्रातील अनेक व्यक्तींनी सहकाराचे तत्त्व रुजवले आणि अनेक संस्था यशस्वीपणे उभे केले. याच पार्श्वभूमीवर शेतकरी कंपनी स्थापित करून त्याचा लाभ शेतकऱ्यांना देण्यासाठी स्मार्ट प्रकल्प सुरु करण्यात आला आहे.शेतकरी संघटित झाले आणि प्रकल्पाचे साखळी उभी राहिली तर मोठ्या उद्योजकांशी स्पर्धा होऊन शेतकऱ्यांना लाभ मिळू शकतो.

शेतकरी कंपन्यांच्या माध्यमातून नवनव्या कल्पना या पुढे येत असून बाजारात मागणीपेक्षा उपलब्धता जास्त झाली तरदर कमी होतात.अशावेळी साठवणूक करून दर वाढविल्यास बाजारात उपलब्ध केल्यासजास्त लाभ मिळतो. त्याकरिता साठवणूक सुविधा,प्रतवारी, शीतगृह, शेतमालावर विविध प्रक्रिया तसेच पॅकेजिंग  आदी बाबींचा विचार या योजनेत केला आहे. पुढील वर्ष महिला शेतकरी सन्मान वर्ष म्हणून साजरा केले जाणार असल्याने कंपनीत 30 टक्के महिला संचालकांच्या अट ठेवण्यात आली आहे. असेच श्री.  भुसे यांनी सांगितले.

( संदर्भ- कृषी नामा )

English Summary: growth value chain through smart project,agriculture minister dadaji bhuse
Published on: 22 December 2021, 02:50 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)