कांदा म्हटलं म्हणजे डोळ्यासमोर येतो त्याचा उग्र वास आणिकापल्या बरोबर डोळ्यात येणारे पाणी.जरगेल्या दीड वर्षाचा विचार केला तर जवळजवळ बऱ्याच कंपन्यांनी कांद्यापासून बनवलेली सौंदर्यप्रसाधने आणि उत्पादने बाजारात आणली आहेत.
या कंपन्यांमध्ये वेदिक्स आणि ममाअर्थ सारखे स्टार्टअपतसेच पॅराशुट सारखे प्रस्थापित कंपन्यांचा देखील समावेश आहे. सध्या कांद्यापासून बनवलेली जवळजवळ डझनभर उत्पादने बाजारात विकली जातात यामध्ये तेल, शाम्पू, कंडीशनर आणि हेअर मास्क इत्यादींचा समावेश आहे.
एका अंदाजानुसार भारतामध्ये कांद्या पासून बनवलेल्या सौंदर्यप्रसाधनांची बाजारपेठ ही पाचशे कोटी रुपयांचे आहे. अलाईड मार्केट रिसर्चच्या रिपोर्ट नुसार,कांद्यापासून बनवलेल्या सौंदर्य उत्पादनाचा व्यवसाय हा 2030 पर्यंत 10.9 टक्के चा संकलित वार्षिक वृद्धी दराने वाढण्याचा अंदाज आहे.
याबाबतीत वेदिक्स चे व्यवसाय प्रमुख जतीन गुजराथी म्हणाले गेल्या काही वर्षात कांद्याच्या सौंदर्य उत्पादनांमध्ये ग्राहकांची आवड वाढल्याचे आम्ही पाहिले आहे.आमच्याकडे नेहमीच अशी उत्पादने आहेत ज्याच्या मध्ये कांद्याचा एक घटक आहे.कांद्याबद्दल ची वाढती आवड लक्षात घेऊन आम्ही आता कांद्या पासून तयार केलेली संपूर्ण श्रेणी बाजारात आणले आहे हा विभाग अनेक पटीने विस्तारेल अशी आमची अपेक्षा आहे असेही ते म्हणाले.वेदिक्स या कंपनीने अलीकडेच कांद्याचे सौंदर्य उत्पादन बाजारात आणले आहेत. कांद्या पासून बनवलेल्या सौंदर्य उत्पादनाचा कल हा भारतातच नव्हे तर अमेरिका आणि युरोप सारख्या जगातील अनेक देशांमध्ये सुद्धा वाढत असून भारतातून त्याची निर्यात केली जात आहे.
का वाढत आहे कांद्याची मागणी?
तज्ञांच्या मते कांद्यामध्ये सल्फरचे प्रमाण जास्त असल्याने त्याच्या मदतीमुळे त्वचा आणि नखे मजबूत होतात. त्वचेची लवचिकता सुधारते आणि केस गळण्याचे प्रमाण देखील कमी होते. तसेच कांद्याचा असलेल्या सल्फर मुळे केसातील कोंडा देखील कमी होतो.त्वचेच्या संसर्गावर सल्फर अत्यंत प्रभावी काम करते.हे कांद्याचे फायदे लोकांना समजू लागल्या मुळे कांद्या पासून बनवलेल्या सौंदर्य उत्पादनांची मागणी वाढत आहे.(साभार-दिव्यमराठी)
Published on: 21 January 2022, 02:17 IST