News

आज केंद्रसरकारने रब्बी पिकांच्या एम एस पी मध्ये वाढ केली आहे. शेतकऱ्यांना आधार व्हावा यासाठी डाळी आणि तेलबिया पिकांच्या हमीभावात जास्तीची वाढ करण्यात आली आहे.

Updated on 08 September, 2021 7:49 PM IST

 आज केंद्रसरकारने रब्बी पिकांच्या एम एस पी मध्ये वाढ केली आहे. शेतकऱ्यांना आधार व्हावा यासाठी डाळी आणि तेलबिया  पिकांच्या हमीभावात जास्तीची वाढ करण्यात आली आहे.

.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली  आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

 केंद्र सरकारने 2022-23 या वर्षासाठी मसूर आणि मोहरी यांच्या किमान आधारभूत किमतीत जवळजवळचारशे रुपये प्रतिक्विंटल वाढ केली आहे. तसेच हरभऱ्याचे एम एस पी  मध्ये देखील 130 रुपये प्रति क्‍विंटल वाढ करण्यात आली आहे तसेच गव्हाचे आधारभूत किमतीत प्रतिक्विंटल 40 रुपये वाढ करण्यात आली आहे.

 नवीन निर्णयानुसार काही पिकांची एम एस पी

  • मसूर– जुनी एम एस पी पाच हजार 100 – नवीन एम एस पी 5500 ( चारशे रुपये वाढ )
  • मोहरी – 4650 – नवीन एम एस पी – 5050 ( चारशे रुपये वाढ )
  • गहू – जुनी एम एस पी 1975 – नवीन एम एस पी 2015 ( चाळीस रुपये वाढ )
  • जव- जुनी एम एस पी 1600 – नवीन एम एस पी 1635 ( 35 रुपये वाढ )

 वस्त्रोद्योगासाठी पी एल आय योजनेला मंजुरी

 कापड उत्पादनात वाढ व्हावी या उद्देशानेकेंद्र सरकारने वस्त्रोद्योगासाठी पी एल आय योजनेला मंजुरी दिली आहे. 

या योजनेअंतर्गत कापड उत्पादनात वृद्धि करण्यासाठी दहा हजार 683 कोटी रुपये खर्च करेल. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की वस्त्रोद्योगासाठी जाहीर केलेल्या या योजनेद्वारे साडेसात लाख लोकांना थेट रोजगार मिळेल. देशातील उत्पादन क्षमता वाढावी आणि निर्यात सुद्धा वाढावी यासाठी मंत्रिमंडळाने 13 क्षेत्रातील पीएला योजनांना मंजुरी दिली होती.

English Summary: growth to msp of wheat mohri etc.
Published on: 08 September 2021, 07:49 IST