News

केंद्र सरकारने ऑगस्ट महिन्यामध्ये सोया पेंड आयातीला परवानगी दिल्यानंतर सोयाबीनचे बाजार भावात मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळाली होती.

Updated on 07 September, 2021 12:33 PM IST

 केंद्र सरकारने ऑगस्ट महिन्यामध्ये सोया पेंड आयातीला परवानगी दिल्यानंतर सोयाबीनचे बाजार भावात  मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळाली होती.

 परंतु वेगवेगळ्या  कारणाचा परिणाम होऊन मागच्या आठवड्यापासून सोयाबीन दरात पुन्हा वाढ पाहायला मिळत आहे.

 यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बऱ्याच प्रमाणात तुटवडा भासत असून चालू हंगाम लांबल्यामुळे आवक कमी होत असून याचा थेट परिणाम भाव वाढ होण्यामागे झाला आहे. यावर्षी देशांतर्गत बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात सोयाबीनचा तुटवडा जाणवत असून दरवर्षीप्रमाणे जाणारा शिल्लक साठा यावर्षी फारच नगण्य आहे.

त्यासोबतच सोयाबीनवर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांमध्ये सोयाबीनची मागणी मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. मध्य प्रदेश हे प्रमुख सोयाबीन उत्पादक राज्य असून त्या ठिकाणाहून नगण्य प्रमाणात आवक सुरू आहे. जर जागतिक बाजाराचा विचार केला तर गेल्या आठवड्यात सोयाबीन दरात तेजी मंदीचे असे संमिश्र वातावरण होते. सट्टेबाजांच्या हजेरीने बाजारात उत्साह निर्माण झाला होता त्यामुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीन दरात पाचशे ते सातशे रुपयांनी सुधारणा झाल्याचे दिसून आले.

सोयाबीन पेंड  आयातीचा सोयाबीन दरावर असलेला परिणाम कमी होऊन दरात सुधारणा झाली. आता दर नऊ हजार ते 10 हजार 500 रुपयांपर्यंत पोचले आहेत.

 सोयाबीन पेंडच्या  दरातही तेजी

देशात सोयाबीन पेंन्डचे दरही तेजीत आहेत. मागच्या आठवड्यात सोयाबीन पेंड च्या दरात तीन ते चार हजार रुपयांपर्यंत सुधारणा झाली. महाराष्ट्रात सोयाबीन पेंडचे दर हे 88 हजार ते 94 हजार रुपये आहेत तर तेच दर मध्यप्रदेश मध्ये 85 हजार ते 87 हजार रुपये पोहोचले आहेत.( संदर्भ- ॲग्रोवन )

English Summary: growth of soyabeon rate from previous week
Published on: 07 September 2021, 12:33 IST