News

मक्या्ला शासनाने 1870 रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केलेला असलातरी ओपन मार्केटमध्ये मक्याला 1500 ते 1600 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे

Updated on 14 November, 2021 7:16 PM IST

मक्‍याला शासनाने 1870 रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केलेला असलातरी ओपन मार्केटमध्ये मक्याला 1500 ते 1600 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे

नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये मक्‍याची आवक वाढू लागली आहे.या आवक वाढल्याचा परिणाम हा शनिवारी नांदगाव बाजार समितीत मक्याचा दर घसरणीवर दिसून आला.नांदगाव बाजार समितीत सरासरी दर हा 1450 रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचला.त्यामुळे मका उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूरनिघत आहे.

 शनिवारी लासलगाव बाजार समितीत धान्याची लिलाव बंद होते. गेल्या शुक्रवारचा विचार केला तर मक्‍याला सरासरी लासलगाव बाजार समितीत 1670 रुपयेप्रति क्विंटलचा भाव मिळाला होता.खरीप हंगामाची तिचे काढण्याची कामे संपत आल्यामुळे शेतकऱ्यांची आता मकाकाढणीचे लगबग सुरू आहे.

तसेच बहुतांशी शेतकऱ्यांना मकाचे साठवणूक करणे शक्य नसल्याने काढल्यानंतर चार-पाच दिवसात मका विक्री केली जाते.तसेच रब्बी हंगामाच्या पिकांचे नियोजन हे मक्याचे उत्पन्नावरच अनेक शेतकरी करीत असतात त्यामुळे सध्या मका मळणीच्या  कामांना वेग आला आहे.

 मका पिकाच्या लागवडी साठी काढणीपर्यंतचा खर्च खूपच येतो.  मक्याच्य सोंगणी साठी मजुरांच्या टोळीकडून एकरी पाच ते सहा हजार रुपये तर काढण्यासाठी मशीन चालकाकडून मळणीसाठी पन्नास रुपये प्रति क्विंटल दर आकारला जातो.

यावर्षी इंधनाच्या दरांमध्ये वाढ झाल्याने मळणीच्या दरातही वाढ झाली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात वाढ झाली आहे.त्यामुळे खुल्या बाजारातील 1400 ते 1500 रुपये प्रति क्विंटलचा मक्याचा भावशेतकऱ्यांना परवडण्याजोगा नाही.दिवाळीनंतर आवक वाढताच भाव घसरु  लागले आहेत. दरम्यान शेतकऱ्यांनी मका विक्रीसाठी आणतांना जास्तीत जास्त सुखावून आणावा असे आवाहन बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

English Summary: growth of incoming of corn in market due to rate is decrease
Published on: 14 November 2021, 07:07 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)