News

खरीप हंगाम अंतिम टप्यात आहे मात्र सोयाबीन च्या दराबाबत कोणतीही चर्चा समोर येत नाहीये. जे की शेतकऱ्यांनी सोयाबीन मोठ्या प्रमाणात साठवून ठेवले आहे मात्र दराबाबत अनिश्चितता दिसून येत आहे. मागील आठ दिवसांपासून सोयाबीन चे दर ७ हजार ३५० रुपये वर स्थिरावले आहेत. जे की या दराचा सोयाबीन आवक वर परिणाम झालेला आहे. मंगळवारी याबाबत परिणाम झालेला आहे जसे की सोयबीन च्या दरात घट झालेली असून आवक वर काय परिणाम होतोय हे पाहावे लागणार आहे. सोयाबीन चे दर स्थित असल्यामुळे लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रति दिन १८ ते २० हजार पोत्यांची आवक सुरू आहे. हंगामाच्या शेवटी सोयाबीन च्या दरात वाढ होईल असा आशावाद शेतकऱ्यांना असल्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन राखून ठेवले आहे

Updated on 15 March, 2022 6:45 PM IST

खरीप हंगाम अंतिम टप्यात आहे मात्र सोयाबीन च्या दराबाबत कोणतीही चर्चा समोर येत नाहीये. जे की शेतकऱ्यांनी सोयाबीन मोठ्या प्रमाणात साठवून ठेवले आहे मात्र दराबाबत अनिश्चितता दिसून येत आहे. मागील आठ दिवसांपासून सोयाबीन चे दर ७ हजार ३५० रुपये वर स्थिरावले आहेत. जे की या दराचा सोयाबीन आवक वर परिणाम झालेला आहे. मंगळवारी याबाबत परिणाम झालेला आहे जसे की सोयबीन च्या दरात घट झालेली असून आवक वर काय परिणाम होतोय हे पाहावे लागणार आहे. सोयाबीन चे दर स्थित असल्यामुळे लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रति दिन १८ ते २० हजार पोत्यांची आवक सुरू आहे. हंगामाच्या शेवटी सोयाबीन च्या दरात वाढ होईल असा आशावाद शेतकऱ्यांना असल्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन राखून ठेवले आहे.

100 रुपयांनी दरात घसरण :-

एका बाजूला रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू आहे जे की हरभरा काढणी सुरू झाली आहे तर काही शेतकऱ्यांनी विक्री करण्यास चालू केले आहे. मात्र सोयाबीन विक्रीबाबत शेतकरी सावधानता बाळगत आहेत. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीन चे प्रति क्विंटल दर ७ हजार ३५० वरून ७ हजार २५० वर येऊन ठेपले आहेत. सोयाबीन चे दर टप्याटप्याने घसरत चालले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान होत चालले आहे. मागील काही दिवसांपूर्वी सोयाबीन चे दर ७ हजार ६०० रुपये वर पोहचले होते तर आता थेट ७ हजार २५० रुवयांवर दर येऊन ठेपले आहेत.

तुरीला हमीभावापेक्षा अधिकचा दर :-

सध्या बाजारपेठेत खरीप हंगामातील तुरी ची आवक सुरू आहे. आतापर्यंत खरेदी केंद्रप्रमाणेच खुल्या बाजारपेठेत तुरी ला दर होते जे की मागील चार दिवसांपासून तुरीच्या दरामध्ये वाढ झालेली आहे. लातूर कृषी बाजार समितीत तूर पिकाला ६ हजार ६५० रुपये भाव मिळाला आहे तर खरेदी केंद्रावर तुरीला ६ हजार ३०० रुपये भाव मिळत आहे. तर हरभरा पिकाचा दर ४ हजार ५०० रुपये वरच स्थिरच आहे. सध्या बाजारपेठेत रब्बी हंगामातील हरभरा तर खरीप हंगामातील सोयाबीन व तूर या पिकांची आवक सुरू आहे.

हरभरा आता खरेदी केंद्रावर :-

सध्या राज्यात सर्वत्र खरेदी केंद्रावर हरभरा विक्री चालू आहे. जे की आतापर्यंत खुल्या बाजारात हरभरा पिकाची विक्री चालू असायची मायर बाजारपेठेत हरभरा पिकाचे दर सुधारत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी खरेदी केंद्राचा पर्याय निवडला आहे. खरेदी केंद्रावर वाढत असलेले दर आणि स्थानिक पातळीवर झालेल्या सोयीमुळे खरेदी केंद्रावर शेतकरी पाहायला भेटत आहेत.

English Summary: Growing concern among soybean growers! Fluctuations among farmers due to falling market prices
Published on: 15 March 2022, 06:45 IST