News

उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे अनेक दिवसा पासून रखडलेली सौर कृषी पंपासाठी असलेली कुसुम योजनेलाअखेर प्रारंभ झाला आहे.

Updated on 19 September, 2021 7:58 PM IST

 उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे अनेक दिवसा पासून रखडलेली सौर कृषी पंपासाठी असलेली कुसुम योजनेलाअखेर प्रारंभ झाला आहे.

राज्यात महाऊर्जा द्वारे राबविण्यात येणाऱ्या या योजनेच्या माध्यमातून जवळजवळ चौदा हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. या योजनेमध्ये लाभार्थ्यांनी त्यांच्याहिश्याची10 टक्के रक्कम अगोदर भरणाऱ्या लाभार्थ्यास प्रथम सौर कृषी पंपाचे  वाटप करण्यात येणार आहे.

 या योजनेत सौर पंपासाठी केंद्र सरकार 30 टक्के आणि राज्य सरकार त्यांच्या वाट्याचे आज 60 टक्के अनुदान देणार आहे. बाकीचे उरलेले दहा टक्के हे लाभार्थ्यास द्यायचे आहे. सौर कृषी पंप योजना यासाठी राज्य सरकारने सुमारे दोन हजार कोटींची तरतूद केली आहे.परंतु काही महिन्यांपासून रखडलेली ही योजना सुरू करण्यासाठीकाही विक्रेत्यांनी स्वारस्य दाखवून जुन्याच दराने काम करण्याची तयारी दर्शविल्यानंतर महा ऊर्जा ने योजनेसाठीची नाव नोंदणी सुरु केली आहे

.केंद्र सरकारने अद्यापकुठल्याही प्रकारचे स्पर्धात्मक दर जाहीर न केल्याने ही योजना पूर्ण क्षमतेने सुरू होण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी एक लाख सौर कृषी पंप वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

English Summary: green signal by high court to kusum yojana
Published on: 19 September 2021, 07:58 IST