News

अहमदनगर : नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील जिरायत भागातील 32 गावांसाठी साकळाई पाणी योजना वरदान ठरणारी आहे. 28 वर्षांपासून या योजनेची मागणी होत आहे. पण फक्त आश्वासनांव्यतिरिक्त जनतेच्या पदरी काही पडत नव्हते. सप्टेंबर 2022 मध्ये त्यांनी प्रयत्न करून साकळाई पाणी योजनेच्या सर्व्हेक्षणास मंजुरी आणली होती. पण पाणी उपलब्ध प्रमाणपत्राची अट असल्यामुळे सर्व्हेक्षणास सुरुवात होत नव्हती. ती अट वगळून नव्याने साकळाई सर्व्हेक्षनाचे आदेश राज्यसरकारने दिले आहेत.

Updated on 02 March, 2023 5:21 PM IST

23 फेब्रुवारी रोजी लोणी प्रवरा या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले असता.खा.सुजय विखे,आमदार पाचपुते, माजी आमदार कर्डीले यांनी साकळाई बाबत उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा केली होती.त्यावेळी उपमुख्यमंत्री यांनी याबाबत लवकरच आदेश येतील असे आश्वासन दिले होते.

त्यानुसार महाराष्ट्र राज्य अव्वर सचिव संदीप भालेराव यांनी आज 2 मार्च रोजी कार्यकारी संचालक कृष्णा खोरे विकास महामंडळ यांना आदेश काढले असून त्यात पाणी उपलब्धता प्रमाणपत्र अट वगळून साकळाई पाणी योजनेच्या सर्व्हेक्षणास परवानगी देण्यात आली असल्याची व त्यासाठी 2 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याबाबत आदेश दिले आहेत. त्यामुळे बहुप्रतिक्षित साकळाई पाणी योजनेच्या सर्व्हेक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

Maharashtra Rain : राज्यातील 'या' पुन्हा कोसळणार धो धो पाऊस!

कुकडी प्रकल्पात आजमितीला 4.98 टीएमसी पाणी शिल्लक असल्याचा जलसंपदा खात्याचाच मे-जून 2022 चा अहवाल आहे.पाणी शिल्लक असताना साकळाई साठी पाणी उपलब्ध प्रमाणपत्र देण्यासाठी जलसंपदा खात्याकडून टाळाटाळ केली जात आहे.

पाणी उपलब्ध असूनही तसे प्रमाणपत्र न देणाऱ्या जलसंपदा विभागास नक्की या पाण्याचे काय करायचे आहे ? कोणाच्या दबावाखाली जलसंपदा खाते जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहे ? या बाबत जनतेमध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

English Summary: Green light for Sakalai Upsa Irrigation Scheme! Clear the way for the survey of 'Sakalai'
Published on: 02 March 2023, 05:18 IST