संपूर्ण देशात शेतकऱ्यांच्या शेतमालाला अपेक्षित असा दर मिळावा तसेच शेतमाल विक्री करण्यासाठी शासनाचा वचक असलेली एक हक्काची जागा असावी यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीत्या उभारण्यात आल्या. मात्र असे असले तरी काळाच्या ओघात आणि पैशांच्या हव्यासापोटी शेतकऱ्यांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांची दिवसाढवळ्या लूटमार होऊ लागली.
ज्या बाजार समित्या शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरु करण्यात आल्या त्यात बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची लूटमार अनेकदा जगजाहीर झाली. असे असताना चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समिती या गुढीपाडवाच्या पावन मुहूर्तावर एक नवीन परंपरेची सुरुवात करत आहे.
चाळीसगाव एपीएमसीने घेतलेला निर्णय इतर उत्पन्न बाजार समितींसाठी लाख मोलाचा संदेश देणारा असेल तसेच यामुळे चाळीसगाव एपीएमसीमध्ये शेतमाल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
चाळीसगाव एपीएमसीने मराठी नववर्षाचा मुहूर्त साधत शेतकऱ्यांना छोटी पण एक महत्वपूर्ण सौगात दिली आहे. एपीएमसीने शेतमाल मोजण्यासाठी भुईकाट्यावरील शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. नववर्षापासून सदर निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. बाजार समितीचा हा निर्णय जरी छोटा भासत असला तरी देखील याचे दूरगामी चांगले परिणाम बघायला मिळू शकतात. बाजार समितीचे मुख्य प्रशासक दिनेश पाटील यांनी हा सदरचा निर्णय घेतला आहे.
चाळीसगाव एपीएमसीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतमाल विक्रीसाठी येत असतो. हंगामात शेतमालाची आवक मोठ्या प्रमाणात वाढते. शेतमाल विक्रीसाठी दाखल झालेल्या वाहनांचे तसेच शेतमालाचे वजन केले जाते यासाठी शेतकऱ्यांना कमीत कमी पन्नास रुपये व अनेकदा त्यापेक्षाही अधिक रक्कम मोजावी लागते.
मात्र, आता शेतकरी बांधवांना शेतमाल मोजणी साठी लागणारा पैसा द्यावा लागणार नाही. बाजार समिती प्रशासनाने भुईकाट्यासाठी शेतकऱ्यांना लागणारा खर्च आता स्वतःच्या माथी घेतला आहे. यामुळे चाळीसगाव एपीएमसीचे उत्पन्न घटणार असून त्यांना सहा लाख रुपयांचा फटका बसणार आहे.
हा निर्णय छोटा जरी असला तरी देखील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करू शकतो. निश्चितच चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकरी हिताचा निर्णय घेतला असून इतर बाजार समित्यांना एक नवीन पायंडा घालून दिला आहे. येत्या काही दिवसात चाळीसगाव एपीएमसी सारखाच निर्णय राज्यातील दुसर्या कृषी उत्पन्न बाजार समिती कडून शेतकरी बांधवांना अपेक्षित आहे.
महत्वाच्या बातम्या:-
खरं काय! शेतकऱ्याने जमीन राखायला ठेवले अस्वल; अस्वलास सॅलरी सुद्धा……
Published on: 31 March 2022, 10:43 IST