निसर्गाच्या लहरीपणामुळे मुख्य पिकांच्या उत्पादनात मोठी घट झाली आहेच मात्र उन्हाळ्यातील हंगामी पिकांनी शेतकऱ्यांना तारले आहे. सध्या कलिंगड पिकाला चांगला भाव मिळाला आहेच त्याचसोबत लिंबाला सुद्धा विक्रमी भाव मिळाला आहे. हंगामाच्या सुरुवातीला २० ते २५ रुपये प्रति किलो असा लिंबाला दर होता तोच दर आता थेट १२५ रुपये वर गेलेला आहे. विक्रमी दर भेटला असला तरी निसर्गाचा लहरीपणा हा नडलेला आहेच जे की उत्पादन घटले असल्याने शेतीमालाचे दर वाढले आहेत. या वाढीव दराचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. स्थानिक बाजारपेठेत सुद्धा लिंबाला चांगला दर भेटत असल्याने शेतकऱ्यांचा वाहतुकीचा प्रश्न मिटलेला आहे.
हंगामाच्या सुरवातीलाच विक्रमी दर :-
यंदा उन्हाळयात मागील काही दिवसात ढगाळ वातावरण निर्माण झाले असल्यामुळे लिंबाच्या मागणीवर परिणाम होईल असे चित्र दिसत होते मात्र आता परिस्थिती बदलली असून दिवसेंदिवस ऊन वाढत चालले असल्याने लिंबाच्या दरात वाढच होत निघाली आहे. हंगामाच्या सुरुवातीला जे २५ रुपये किलो ने लिंबू विकत जात होते तेच आज १२५ रुपये वर गेले आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीत चांगलीच भर दिसत आहे. मध्ये जे वातावरण झाले त्यामुळे जरी लिंबावर काळे डाग पडले असले तरी लिंबाचा चांगली मागणी आहे.
वाढत्या दराचा परिणाम शीतपेयांवरही :-
उन्हाळयात लिंबू विकण्यासाठी शेतकरी योग्य ते नियोजन करतो जे की त्यानुसार तो शेतात लागवड करतो. जरी शेतकऱ्याने व्यवस्थित नियोजन केले असले तरी निसर्गाच्या लहरीपणामुळे सर्व काही बिघडले आहे. स्थानिक शेतकऱ्याकडे लिंबू नसल्याने व्यापाऱ्याला लिंबू आयात करणे अवघड झाले आहे. जरी माल शिल्लक राहिला तर भाव भेटत नाही आणि दर चांगला असला की माल नसतो अशी गत झाली आहे. व्यापारी लिंबाची आयत तर करत आहे मात्र अधिक मागणी झाली आणि दरात घट झाली तर नुकसान हे ठरलेले आहे. शेतकऱ्यांनी आणि व्यापाऱ्यांनी सुद्धा दराला बघून सावध राहणे गरजेचे आहे.
लिंबाच्या बागांनाही अवकाळीचा फटका :-
दिवसेंदिवस उन्हात वाढच होत चालली असल्यामुळे लिंबाला मोठ्या प्रमाणात मागणी वाढत चालली आहे. परंतु याआधी लिंबाची परिस्थिती बिकट चालू होती. अवकाळी वातावरण सर्वच पिकांवर बरसले आहे. यामधून लिंबाची सुद्धा सुटका झालेली नाही. महाराष्ट्र राज्यात अनेक भागात अगदी एका रात्रीत पिकांचे चित्र बदलत आहे. जास्त असा लिंबाच्या उत्पादनात फरक पडला नसून विक्रमी भाव मिळत असल्याने शेतकरी खुश आहे.
Published on: 02 April 2022, 06:06 IST