जर आपले जनधन खाते असेल तर आपल्याला बँकांकडून जबरदस्त ऑफर मिळणार आहे. जनधन खात्याच्या एटीएम कार्डच्या वापरावर मोठी सूट मिळत आहे. याचा उपयोग तुम्ही खरेदीसाठी करू शकतात.रुपे फेस्टिव कार्निवल सूरू झाला आहे. यात धमाकेदार ऑफर्स आणि डिस्काउंट दिले जात आहेत.एटीएम कार्ड देणारी कंपनी नॅशनल पेमेंट्स कॉरपोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) ने एटीएम कार्डधारकांनासाठी विशेष फायदा देण्याची घोषणा करण्यात आली आहे.तर जाणून घेऊया या ऑफरविषयी..एनपीसीआयने सांगितले आहे की, रुपे कार्ड वापरकर्त्यांना अनेक कॅटेगरीत लाभ देण्यात येणार आहे.
यात हेल्थ, फिटनेस, शिक्षण आणि ई-कॉमर्सचे आकर्षक ऑफरचा लाभ या सणांचा हंगामात घेऊ शकतात.यासह डायनिंग आणि फूड डिलिव्हरी, खरेदी, मनोरंजन आणि फार्मेसी सारख्या कॅटेगरीतील ऑफर्सचाही फायदा आता घेऊ शकणार आहात. कॅशलेसला प्रोत्साहन देण्यासाठी एनपीसीआयने ही ऑफर आणली आहे. यामुळे एटीएम कार्ड वापरकर्ते सुरक्षितपणे कॅशलेस पेमेंट करू शकतील.कोरोना काळात कॅशलेस व्यवहार वाढले आहेत. यात अशा ऑफर दिल्याने ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. एनपीसीआयनुसार,जनधन खातेधारकांची खरेदी वाढवी यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
जनधन खातेधारक आता अॅमेझॉन, स्विगी, सॅमसंग, मिंत्रा,ऑजिओ, फ्लिपकार्ट, शॉपर्स स्टॉप, लाईफस्टाईल,बाटा, हेमलिस, जी५, टाटा स्काय,मॅक्डोनाल्ड डोमिनो. डाऊनआऊट स्विगी,अपोलो फार्मेसी, नेटमेट्स सारख्या ब्रँडवर यात सणांच्या दिवसात १० ते ६५ टक्क्यांपर्यंतची सूट मिळवू शकतात. ई-कॉमर्स शॉपिंग ते एज्युकेशनपर्यंतच्या रुपे फेस्टिव कार्निवलमध्ये ग्राहकांना दमदार ऑफर्स दिल्या जात आहेत.यात मिंत्रावर १० टक्के, टेस्टबूक डॉटकॉमच्या टेस्ट पासवर ६५ टक्के सूट,सॅमसंगच्या टीव्ही, एसी आणि स्मार्टफोनवर ५२ टक्के सूट, बाटावर २५ टक्के सूट मिळत आहे.
Published on: 28 October 2020, 05:13 IST