News

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.

Updated on 19 June, 2022 9:35 PM IST

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. सुप्रिम कोर्टात काही जागांसाठी नोकर भरती होत असून, त्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.. (Recruitment in Supream court)सुप्रिम कोर्टात होत असलेल्या या भरतीतील रिक्त जागांची संख्या तात्पुरती आहे.. प्रशासकीय कारणांमुळे ही संख्या बदलू शकते. त्यात वाढ किंवा घट करण्याचे अधिकार राखून ठेवल्याचे अधिकृत अधिसूचनेत म्हटलं आहे.

त्यात वाढ किंवा घट करण्याचे अधिकार राखून ठेवल्याचे अधिकृत अधिसूचनेत म्हटलं आहे. या भरतीबाबत सविस्तर जाणून घेऊ या.एकूण जागा – 210या पदासाठी भरती – कनिष्ठ न्यायालय सहाय्यक (Junior Court Assistant Group ‘B’ NonGazetted)पगार - निवड झालेल्या उमेदवारांना पे मॅट्रिक्सच्या लेव्हल 6 मध्ये सुरुवातीला 35,400/- एचआरएसह भत्त्यांच्या सध्याच्या दरानुसार अंदाजे ग्रॉस सॅलरी रु. 63068/- प्रतिमहिना (प्री-रिवाइज्ड पे स्केल पीबी-2 सह ग्रेड पे 4200/- रुपये)

शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवीसंगणकावर इंग्रजी टंकलेखनात किमान वेग 35 शब्द एका मिनिटात ,संगणकाचे ज्ञानअर्जासाठी नोंदणी प्रक्रिया सुरु – 18 जून 2022ऑनलाइन अर्जासाठी शेवटची तारीख – 10 जुलै 2022अर्ज फी जनरल व ओबीसी प्रवर्गासाठी – 500 रुपये एससी/एसटी/माजी सैनिक/पीएच/स्वातंत्र्यसैनिक प्रवर्गासाठी – 250 रुपये

अशी होणार निवड ऑप्शन बेस्ड 100 प्रश्नांचा एक पेपर असेल.ऑब्जेक्टिव्ह टाइप कॉम्प्युटर नॉलेज टेस्ट (25 प्रश्न) संगणकावर टंकलेखन (इंग्रजी) परीक्षा होणार (कमीत कमी वेगासह 35 w.p.m टाइपिंग स्पीड असावं) (3% चुकांना परवानगी) वर्णनात्मक चाचणी (इंग्रजी भाषेत) त्यात आकलन परिच्छेद, अचूक लेखन आणि निबंध लेखनाचा समावेश मुलाखत

 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – sci.gov.in

English Summary: Great government job opportunities for young graduates
Published on: 19 June 2022, 09:35 IST