नाशिक : राज्याच्या विविध भागात पुर्वमोसमी पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट होत आहे. आज विदर्भ, मराठवाडा मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला असून फळ बागदारांना मोठा फटका बसत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे द्राक्ष हंगाम अडचणी सापडडला असून शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
शेतकऱ्यांनी मोठा पैसा खर्च करुन द्राक्षाचे उत्पादन घेत आहेत, पण अवकाळी पावसामुळे तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. गुरुवारी झालेल्या अवकाळी पावसाच्या तडाख्यात निफाड तालुक्यातील अनेक गावांमधील द्राक्षबागा जमीनदोस्त झाल्या आहेत. त्यामुळे कोरोनाच्या पाठोपाठ आता नैसर्गिक आपत्तीला द्राक्ष उत्पादकांना सामोरे जावे लागत आहे. सलग दुसऱ्या दिवशी पाऊस आणि गारपीट झाल्याने बागांना फटका बसला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर माल बाधित झाला आहे. दरम्यान जगात सुरू असलेल्या कोरोनामुळे व्यापारी माल खरेदी करत नसल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे. त्यामुळे बेदाणा करण्यासाठी अनेकांनी पसंती दिली होती. मात्र, काढणीपूर्वीच माल मातीमोल झाला आहे. त्यामुळे एकरी केलेला लाखो रुपयाचा खर्च वाया गेला असून आता पुन्हा बागा उभ्या करण्यासाठी मोठा खर्च येणार असल्याने शेतकऱ्यांची ऐन हंगामात कोंडी झाल्याने अडचणीत वाढ झाली आहे.
Published on: 28 March 2020, 10:20 IST