News

निसर्गाच्या लहरीपणामुळे नेहमी शेतकऱ्यांचे नुकसान होत असते. त्यामुळे आता माल विक्रीआधी दर निश्चित केले गेले आहेत. जिल्हा उत्पादक संघांनी स्थानिक बाजारपेठेमध्ये निर्यात होणाऱ्या द्राक्षाचे आधीच दर ठरवले आहेत. आता ही पद्धत पपईसाठी सुद्धा लागू केलेली आहे जे की ज्या भागात जास्त पपई चे उत्पादन निघणार आहे त्या भागातील शेतकरी आता दर ठरवणार आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांना याबाबत मोठा दिलासा मिळणार आहे.

Updated on 31 January, 2022 11:13 AM IST

निसर्गाच्या लहरीपणामुळे नेहमी शेतकऱ्यांचे नुकसान होत असते. त्यामुळे आता माल विक्रीआधी दर निश्चित केले गेले आहेत. जिल्हा उत्पादक संघांनी स्थानिक बाजारपेठेमध्ये निर्यात होणाऱ्या द्राक्षाचे आधीच दर ठरवले आहेत. आता ही पद्धत पपईसाठी सुद्धा लागू केलेली आहे जे की ज्या भागात जास्त पपई चे उत्पादन निघणार आहे त्या भागातील शेतकरी आता दर ठरवणार आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांना याबाबत मोठा दिलासा मिळणार आहे.

या भागात झाले दर निश्चित :-

नाशिक, सांगली, सोलापूर या भागात द्राक्षाचे दर निश्चित केले आहेत तर पपई चे दर नंदुरबार येथे निश्चित करण्याचे ठरवले गेले आहे. मागील अनेक दिवसांपासून पपई च्या दराबाबत चढउतार चालू होता जे की यासाठी शहादा येथे बैठक सुद्धा झालेली आहे. शहादा येथील बैठकीत एका पपई ला ७ रुपये ५ पैसे दराने पपई खरेदी करण्याचा निर्णय सुद्धा झालेला आहे. या निर्णयामुळे पपई उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे मात्र आता व्यापारी वर्ग कोणती भूमिका घेतोय हे पाहावे लागणार आहे.

यामुळे घ्यावा लागला निर्णय :-

वातावरणात सारखे बदल होत असल्याने पपई उत्पादकांनी पपई काढण्यावरभर दिलेला आहे तसेच काही शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारे जोपासना केल्यामुळे पपई चा माल ही चांगल्या दर्जाचा निघाला आहे. उत्तर भारतात थंडी पडल्याने पपई ला मागणी नाही असे कारण देऊन व्यापारी वर्ग कमी दरात पपई खरेदी करत आहेत. मागील अनेक दिवसांपासून असे घडत असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शहादा येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

शहादा तालुक्यात सर्वाधिक उत्पादन :-

एकट्या नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात ४ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर पपई ची लागवड करण्यात आली आहे. पोषक वातावरण झाल्यामुळे पपई च्या उत्पादनात चांगली वाढ ही झालेली आहे. परंतु वातावरणाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना संकटांचा सामना करावा लागला आहे. घटलेल्या दराचा फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे. बैठकीत जो निर्णय झालेला आहे मात्र व्यापारी वर्गाची काय भूमिका असणार आहे हे पाहावे लागणार आहे.

English Summary: Grapes are priced, but what about papaya prices? All eyes are on the merchant class
Published on: 31 January 2022, 11:13 IST