सध्याच्या परिस्थितीमध्ये द्राक्ष उत्पादक शेतकरी हे संकटाच्या घेऱ्यात सापडलेले आहेत. इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची झालेली पाहायला मिळत आहे.
अतिवृष्टी, अवकाळी आणि हवामानातील बदल द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी मारक ठरत आहेत. तरीही आशा संकटांवर मात करीत द्राक्ष उत्पादकांनी द्राक्ष बागा जगवल्या आणि टपोरी द्राक्षांचे घड झाडावर लगडली. परंतु अगदी अंतिम टप्प्यात तोंडात घास यायच्या वेळेसच तो घास हिरावून घेण्यासारखा काहीसा प्रकार घडला.
नक्की वाचा:दादांनो! कुठल्याही पिकासाठी स्लरी आहे खूपच महत्वाची; जाणून घेऊ स्लरीचे प्रकार आणि फायदे
जर यामध्ये सांगली जिल्ह्याचा विचार केला तर, नेमक्या द्राक्ष तोडणीच्या वेळेसच अवकाळी पाऊस आल्याने त्याचा परिणाम द्राक्षांवर झाला. मध्येच अवकाळी पाऊस आणि कडक ऊन अशा वातावरणामुळे तयार द्राक्षांना तडे गेले आहेत. यामुळे उत्पादनावर तर परिणाम होणारच आहे
परंतु असे तडे गेलेले द्राक्ष खरेदी करण्याचे व्यापाऱ्यांनी बंद केले आहे. त्यामुळे समोर जेवणाचे ताट तर भरून आहे, परंतु जेवता येत नाही अशी परिस्थिती झाली आहे.ऊन पावसाच्या या खेळामध्ये द्राक्षांना तडे जाण्याची जास्त भीती आहे.
नक्की वाचा:गृह विमा पॉलिसी विषयी तुम्हाला माहिती आहे का? नाही तर वाचा आणि घ्या जानून
त्यामुळे नुकसान होऊ नये म्हणून व्यापाऱ्यांनी सावध भूमिका घेत खरेदीच बंद केली आहे. व्यापाऱ्यांच्या या भूमिकेवर शेतकऱ्यांचा आरोप आहे की, द्राक्षाचे भाव कमी करण्यासाठी व्यापारी ही युक्ती योजित आहेत.
लाखो रुपये खर्च करून पोटच्या मुलाप्रमाणे बागांचे संगोपन करून सोन्यासारखा माल पिकवून विक्रीच्या वेळेस हा खेळ उभा राहिल्याने आता उत्पन्न तर सोडाच परंतु आभाळभर निराशा शेतकऱ्यांच्या मनात येऊन उभी ठाकली आहे.
Published on: 29 March 2022, 09:19 IST