News

अतिवृष्टी, आताचे ढगाळ हवामान,वातावरणातील बदल इत्यादी नैसर्गिक कारणांमुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी कमालीचे संकटात सापडले आहेत. द्राक्षे पीक वातावरणाला अतिसंवेदनशील असल्यामुळे अशा वातावरणाचा विपरीत परिणाम द्राक्षबागांवर होतो.

Updated on 10 January, 2022 6:15 PM IST

अतिवृष्टी, आताचे ढगाळ हवामान,वातावरणातील बदल इत्यादी नैसर्गिक कारणांमुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी कमालीचे संकटात सापडले आहेत. द्राक्षे पीक वातावरणाला अतिसंवेदनशील असल्यामुळे अशा वातावरणाचा विपरीत परिणाम द्राक्षबागांवर होतो.

द्राक्ष बागायतदार अक्षरशा जीवाचे रान करून प्रचंड मेहनत आणि खर्च करून द्राक्षबागा वाचवतात. त्यातही  द्राक्षाला योग्य तो भाव मिळत नाही. परंतु अशाही परिस्थितीत सगळ्या संकटांचा सामना करत नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी द्राक्ष जिल्ह्यातील सुरुवात केली आहे.

 नेदरलँड आणि बेल्जियमला निर्यात..

 या सगळ्या नैसर्गिक परिस्थितीवर मात करून द्राक्ष निर्यातीसाठी प्रचंड स्वरूपात प्रयत्न करून अखेर द्राक्ष बागातदार संघाला यश मिळाले आहे.नाशिक जिल्ह्यातून नेदरलँड व बेल्जियम साठी जवळजवळ 89 मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली आहे.

त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना थोडा का होईना यामाध्यमातून दिलासा मिळालेला आहे. सगळी नैसर्गिक प्रतिकूल परिस्थिती असताना परकीय चलनाच्या माध्यमातून जास्तीचा नफा मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी निर्यातीला सुरुवात केली आहे. यामध्ये शासनाची भूमिका देखील महत्त्वाचे ठरते.द्राक्ष निर्यातीच्या माध्यमातून देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळते.

त्यासाठी केंद्र सरकारने देखिल नवनवीन बाजारपेठा शोधून द्राक्ष निर्यात वाढवण्यावर भर देण्याची आवश्यकता आहे. तसेच यावरची इंधन दरांमध्ये वाढ झाल्याने त्यासोबतच पॅकिंग साहित्य यांचे भाव वाढल्याने निर्यात खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने मालवाहतूक भाड्यात 50 टक्के अनुदान द्यावे अशी मागणी होत आहे.

English Summary: grape in nashik is export in belgium and nertherland to get benifit to foriegn currency
Published on: 10 January 2022, 06:15 IST