2020 मध्ये कोरोनामुळे सर्वात जास्त बिकट परिस्थिती महाराष्ट्र राज्याची झाली होती. नाशिक जिल्ह्यात तर कोरोनाने अक्षरशा थैमान माजवले होते, त्यामुळे याचा सर्वात मोठा फटका राज्यातील तसेच जिल्ह्यातील शेतकरी वर्गाला (To the farmers of the Nashik district) बसला होता. पहिल्या लॉकडाउन मध्ये म्हणजे मार्च 2020 मध्ये द्राक्ष आगार (Grape Depot) म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी अवकाळी (Untimely Rain) समवेत अनेक समस्यांना तोंड देत द्राक्ष बागांची जोपासना केली तसेच त्यातून चांगले विक्रमी उत्पादन देखील मिळवले. मात्र नेमके द्राक्षे काढण्याच्या वेळीच (Just at the time of grape harvest) नाशिक जिल्ह्यासमवेत राज्यात कडक निर्बंध लादण्यात आले. तेव्हा जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना कोट्यावधी रुपयांचा फटका बसला होता असे नमूद करण्यात आले होते.
जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी या संकटातून कसेबसे बाहेर पडले आणि परत एकदा 2021 या वर्षात जोमाने द्राक्ष बाग जोपासण्यासाठी प्रयत्नरत झालेत मात्र नियतीला काही औरच मान्य होतं (Destiny accepted something else), 2021 मध्ये देखील कोरोना च्या दुसऱ्या लाटेने देशात दस्तक दिली. यावेळी देखील ऐन द्राक्ष काढणीच्या वेळी राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले. नाशिक जिल्ह्यात तर परिस्थिती जास्तीची खराब असल्यामुळे जिल्ह्यात अगदी ग्रामीण भागात देखील कडक निर्बंध बघायला मिळाले होते. त्यावेळी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना द्राक्ष विक्री करतांना अक्षरशः नाकी नऊ आले होते, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी (By grape growers) त्यावेळी गावोगावी भटकंती करून, दारोदारी फिरून, हालअपेष्टा सहन करून आपला सोन्यासारखा माल अगदी कवडीमोल दरात (At a rock bottom price) विकला होता. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे तेव्हा देखील कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले. या दुसऱ्या लॉकडाऊन मध्ये द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी अक्षरशा दहा ते वीस रुपये किलो दराने द्राक्ष विक्री केले, त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना द्राक्ष बागा जोपासण्यासाठी आलेला खर्च देखील काढणे मुश्कील झाले होते.
राज्यात पुन्हा कोरोना नामक संकट उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे, जिल्ह्यातही कोरोनाची रुग्ण संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे, शासन दरबारी कोरोना नियंत्रण करण्यासाठी अनेक उपाय योजना देखील राबविल्या जात आहेत. मात्र असे असले तरी कोरोना नियंत्रणात येईल की नाही यावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. यावेळी कोरोना समवेतच कोरोना चा नवा वैरिएंट ओमिक्रोन (New variant Omicron) देखील राज्यात हाहाकार माजवायला रेडी होतांना दिसत आहे, त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये कमालीचे भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
शासन दरबारी अनेक ठिकाणी आतापासूनच निर्बंध लावण्याची तयारी सुरू झाली आहे, या निर्बंधामुळे सर्वात जास्त भीतीचे वातावरण द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमध्ये (The most feared environment among grape growers) दिसत आहे. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी मागील दोन्ही लॉकडाऊन मध्ये कमालीच्या हाल अपेष्टा सहन केल्या आहेत. त्यामुळे आता राज्यात परत कडक निर्बंध लादण्यात येऊ नयेत तसेच कोरोना राज्यात परत वेगाने पसरू नये यासाठी द्राक्ष उत्पादक शेतकरी देवाकडे साकडे घालत आहेत. म्हणुन आता पुन्हा लॉकडाऊन नको रे बाबा…..! असेच प्रत्येकाला वाटत आहे.
Published on: 04 January 2022, 05:47 IST