News

राज्यात फळबाग पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते, फळबाग पिकांपैकी प्रमुख असलेल्या द्राक्षाची लागवड राज्यात लक्षणीय बघायला मिळते. पश्चिम महाराष्ट्रातसर्वात जास्त द्राक्षाच्या बागा बघायला मिळतात, याच विभागातील नाशिक जिल्ह्याला द्राक्षाची पंढरी म्हणून देखील संबोधले जाते. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातच द्राक्ष बागायतदारांना पुढे आता एक नवे आवाहन उभे राहिले आहे. सोलापूर जिल्ह्यात विशेषतः दक्षिण सोलापूर तालुक्यात गेल्या अनेक दिवसापासून ढगाळ वातावरण कायम आहे. या तयार झालेल्या ढगाळ वातावरणामुळे तालुक्यातील द्राक्ष बागा सर्वात जास्त प्रभावित झाल्याचे चित्र नजरेस पडत आहे.

Updated on 20 January, 2022 10:05 PM IST

ढगाळ वातावरणामुळे व तालुक्यात वाढलेल्या गारव्यामुळे द्राक्ष पिकावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव प्रकर्षाने जाणवत आहे. भूरी रोगासमवेतच तालुक्यातील द्राक्षबागांवर द्राक्ष मण्यांना तडे जाण्याची समस्या देखील समोर आली आहे. तालुक्यातील द्राक्ष बागायतदारांना भुरी रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी महागड्या औषधांची फवारणी करावी लागत आहे, त्यामुळे तालुक्यातील द्राक्ष बागा जोपासण्यासाठी खर्चात मोठी वाढ झाली आहे, म्हणून द्राक्षाचे उत्पादन खर्च नेहमीपेक्षा अधिक झाल्याचे द्राक्षबागायतदार सांगत आहेत. भुरी रोगामुळे द्राक्ष उत्पादनावर विपरीत परिणाम होणार असल्याचे सांगितले जात आहे शिवाय द्राक्ष मण्यांना तडे जात असल्याने देखील द्राक्षबागांचे नुकसान अटळ असल्याचे बोल्ले जातं आहे.

शेतकरी मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, तालुक्यात जवळपास एक हजार हेक्टर क्षेत्रावर द्राक्ष लागवड केली गेली आहे. एवढ्या मोठ्या क्षेत्रावरची द्राक्ष लागवड बदलत्या वातावरणामुळे प्रभावित झाल्याचे समोर येत आहे. तालुक्यातील अनेक द्राक्षबागायतदार यांचे द्राक्ष काढणी साठी आले आहेत, मात्र बदलत्या वातावरणामुळे द्राक्ष खरेदी करणारे व्यापारी द्राक्ष खरेदीसाठी उत्सुक दिसत नाहीयेत. त्यामुळे काढण्यासाठी आलेल्या द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात क्षती होत आहे. तालुक्यातील बहुतांश द्राक्ष उत्पादक शेतकरी द्राक्षांना चांगला बाजारभाव मिळत नसल्याने द्राक्षापासून बेदाणे निर्मिती करून विक्री करत असतात, यातून द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांना मोठा नफा देखील मिळत असतो. मात्र सध्या तालुक्यात तयार झालेल्या वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बेदाणे निर्मितीसाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. बेदाणे निर्मिती साठी द्राक्षांना वाळवावे लागते मात्र तालुक्यात सर्वत्र ढगाळ वातावरण असल्यामुळे द्राक्ष वाढवण्यासाठी कोरडे हवामान उपलब्ध नाहीये, म्हणून द्राक्षापासून बेदाणे तयारच होऊ शकत नाही. त्यामुळे तालुक्यातील द्राक्ष बागायतदार काढणीसाठी आलेले द्राक्ष विक्री करण्यावर जास्त भर देताना दिसत आहेत. मात्र, बदलत्या हवामानामुळे व्यापारी द्राक्षांचे खरेदी करण्यास आनाकानी करताना दिसत आहेत. 

तसेच तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या मते अनेक व्यापारी लॉकडाऊन ची भीती दाखवून व त्या संदर्भात फेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून द्राक्षांच्या दराबाबत शेतकऱ्यांच्या मनात संभ्रमता तयार करत आहेत. मात्र अशा व्हिडिओ वर विश्वास न ठेवता, ठरवलेल्या दरावर द्राक्षांची विक्री करण्याचे आव्हान येथील प्रगत शेतकऱ्यांनी केले आहे. द्राक्ष बागांवर भुरी रोग नजरेस पडताच त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य त्या औषधांची फवारणी करण्याचा सल्ला दिला गेला आहे. जर द्राक्ष मण्यांना तडे जात असतील, तर पाणी देताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. म्हणून द्राक्ष बागांना संतुलित प्रमाणात पाणी द्यावे असे देखील यावेळी वैज्ञानिकांनी नमूद केलं.

English Summary: Grape Growers In Solapur Stuck in danger situation
Published on: 20 January 2022, 10:05 IST