द्राक्ष पंढरी म्हणून विख्यात असलेल्या नाशिक जिल्ह्यात या वेळी द्राक्ष काढणीचे कामे सुरू आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून द्राक्ष पिकाला अगदी कवडीमोल बाजार भाव प्राप्त होत होता त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादनखर्च काढणे देखील मोठ्या मुश्कीलीचे होऊन बसले होते. द्राक्ष उत्पादकांची हीच समस्या हेरून नाशिक येथील द्राक्ष बागायतदार संघाने द्राक्ष खरेदीसाठी दरांची निश्चिती केली होती. द्राक्ष बागायतदार संघाने डिसेंबर महिन्यात द्राक्ष निर्यातदार आणि द्राक्ष बागायतदार यांच्या सामूहिक बैठकीचे आयोजन केले होते, बैठकीदरम्यान द्राक्ष पिकाच्या दराबाबत चर्चा करण्यात आली व द्राक्ष साठी दरांची निश्चिती करण्यात आली.
द्राक्ष बागायतदार आणि द्राक्ष निर्यात करणारे व्यापारी यांच्या बैठकीत, सर्वानुमते जानेवारी महिन्यात 82 रुपये किलोने द्राक्ष खरेदी करण्याचे ठरले होते. मात्र, द्राक्ष निर्यातदारांनी नुकतेच नाशिक जिल्ह्यातील अनेक द्राक्षबागायतदाराकडून ठरवलेल्या दरापेक्षा कमी दराने द्राक्षांची मागणी केली. एवढेच नाही तर, द्राक्ष निर्यातदारांनी द्राक्षे खरेदी करणे देखील बंद केले होते. द्राक्ष बागायतदार आणि द्राक्ष निर्यातदार यांच्यामध्ये झालेला वाद शिगेला पेटलेला होता म्हणून द्राक्ष बागायतदार संघाने पुन्हा एकदा एका बैठकीचे आयोजन केले. द्राक्ष बागायतदार संघाने बैठकीत निर्यातदारांना सांगितले की, तुम्ही देखील शेतकरी पुत्र आहात,गेल्या अनेक वर्षापासून द्राक्ष बागायतदारांना अपेक्षित दर प्राप्त होत नाहीये त्यामुळे द्राक्ष बागायतदारांना उत्पादन खर्च देखील निघत नाहीये आणि म्हणूनच अनेक द्राक्ष बागायतदार कर्जबाजारी झाल्याचे देखील उघड झाले आहे. त्यामुळे द्राक्ष बागायतदारांना या प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी सर्वांनीच प्रयत्नरत होणे गरजेचे आहे, आणि त्यामुळे द्राक्षाच्या दराबाबत सहानुभूतीने विचार करणे अनिवार्य आहे.
शेतकरी मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, डिसेंबर महिन्यात आयोजित केल्या गेलेल्या बैठकीत, द्राक्षासाठी जो दर ठरवण्यात आला, या बाजारभावात उत्पादन खर्च वजा जाता केवळ दहा टक्के निव्वळ नफा शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे द्राक्ष बागायतदार संघाने, नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत आधीच्या ठरवलेल्या दरांतच द्राक्षाची खरेदी केली जावी याचे पूर जोर समर्थन केले आहे. मित्रांनो जानेवारी महिन्यासाठी 82 रुपये किलो द्राक्षाला दर ठरविण्यात आले होते, मात्र अनेक द्राक्ष निर्यातदार ठरवलेला दर परवडत नाही म्हणून याचा विरोध करत होते. तसेच द्राक्ष निर्यातदारांनी फक्त 45 रुपये किलो दराने द्राक्षांची मागणी केल्याचे समोर आले आहे.
त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील अनेक द्राक्ष बागायतदारांना ठरवून दिलेल्या दरापेक्षा कमी दरात द्राक्षांची विक्री करावी लागत आहे, तर काही ठिकाणी काढणी देखील बंद झाली आहे. मात्र, नुकत्याच आयोजित केल्या गेलेल्या बैठकीत द्राक्षांच्या दराबाबत सहमती बनण्याचे चित्र नजरेस पडत आहे. बैठकीत द्राक्ष निर्यातदारांनी द्राक्षाचे दर कशा पद्धतीने योग्य आहेत याचा दुजोरा देण्यात आला. आता रशियासाठी निर्यात होणारे द्राक्ष ठरवून दिलेल्या दरातच म्हणजेच जानेवारी महिन्यासाठी 82 रुपये किलो दराने खरेदी केले जातील असे सूत्र सांगत आहेत.
Published on: 21 January 2022, 02:00 IST