महाराष्ट्र शासना कडून अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात सिंचन विहीर खोदण्यासाठी आणि त्याचबरोबर विविध वाणांचे फळबाग लागवड करण्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना चालू केली गेलीय.
या मनरेगा योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यातील पाथरी, पालम, पूर्णा, परभणी, जिंतूर, सोनपेठ, मानवत, सेलू, गंगाखेड तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत विहरी खोदून त्याचे बांधकामही पूर्ण केले.
त्याचबरोबर पात्र मंजूर शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीत विविध फळबागा लागवड केल्या .परंतु सिंचन विहरींचे खोदकाम बांधून पूर्ण होऊन देखील त्याचे लेबरपेमेंट व कुशल आनूदान पेमेंट गेल्या कित्येक दिवसापासून ठप्प झाले आहे.
लोकांच्या खिशावर होणार परिणाम; आजपासून दुधाच्या दरात पुन्हा वाढ!
फळबागेचे शुध्दा मस्टर काढणे मजूराचे पेमेंट अनूदान बंद आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील सिंचन विहीर व फळबागा लागवडधारक योजना पात्र शेतकरी आता वैतागून जावून मोठ्या आंदोलनाच्या तयारीत आहेत.
प्रतिनिधी -
आनंद ढोणे पाटील परभणी
सेंद्रिय शेती लोकांना वाटते तितकी सोपी नाही : मनोज कुमार मेनन
Published on: 01 April 2023, 12:11 IST