News

शेतकर्यासह स्वाभिमानी चे विनायक सरनाईक यांनी घेतली जिल्हाधिकारी यांची भेट चिखली- प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे व चुकीमुळे गारपिटीने नुकसान झालेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाकडुन निधी प्राप्त होऊनही,

Updated on 04 December, 2021 7:21 PM IST

अद्याप मदत न मिळाल्यामुळे चिखली तालुक्यातील नुकसाग्रस्त शेतकर्यासह स्वाभिमानी चे विनायक सरनाईक यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांची दि03डीसेंबर रोजी भेट घेत सदरची चुक प्रशासनाची असल्याचे निदर्शनास आणुन दिले दरम्याण तालुक्यातील कांदा नूकसान झालेल्या शेतकर्याची रक्कम तातडीने त्यांच्या खात्यावर जमा करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे की,दि.14 एप्रिल 2021 रोजी चिखली तालुक्यातील शेलगाव जहागीर, खडाळा मकरध्वज, मुंगसरी आन्वी, तेल्हारा या शिवारांमध्ये मोठ्या प्रमाणात वादळीवार्‍यासह गारपीट झाली होती. तेव्हा या भागात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी सरनाईक यांनी केली होती.तेव्हा शेतकऱ्यांच्या बांधावर जात कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक मंडळ अधिकारी यांनी संयुक्त पंचनामे सुद्धा केले होते. याबाबतचा नुकसानीचा अहवालदेखील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व संबंधित विभागाकडे दिलेला आहे.असे संदर्भीय पत्रातुन स्पष्ट दिसुन येत आहे.त्याचप्रमाणे याबाबतचा नैसर्गिक आपत्ती विभागांतर्गत अ, ब, क, ड अहवालही कृषि विभाग, बुलडाणा यांच्याकडे सादर करण्यात आला होता.

या कालावधीत झालेल्या नुकसानीपोटी शासनाकडून मदतसुद्धा देण्यात आली आहे,असे तहसीलदार व तालुका कृषि अधिकारी चिखली यांच्या संयुक्त पत्रामध्ये स्पष्ट नमूद आहे.

परंतु त्यानंतरच्या नुकसानग्रस्तांच्या खात्यावर मदत जमा झाली असल्याने व एप्रिलमध्ये गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अद्याप मदत न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रशासनाप्रति प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. याबाबत चिखली तहसील कार्यालय व तालुका कृषी विभाग, अकोला यांना विचारणा केली असता, अनुदान रक्कम परत आल्यास देण्यात येईल अशी उडवाउडवीची उत्तरे शेतकऱ्यांना दिली जात असून वेळकाढू धोरण संबंधित विभागाकडून अवलंबले जात असल्याने नुकसानीचा अहवाल वेळेत पाठवला असता तर शेतकऱ्यांना तहसील कार्यालयाकडे चकरा मारण्याची वेळ आली नसती.असा आरोप करीत शेतकऱ्यांना मदत वेळेत न मिळाल्याप्रकरणी चौकशी करण्यात यावी.सदरील गावातील एकूण १७४ शेतकर्‍यांची रक्कम आजपर्यंत प्राप्त झाली नाही. शासन आदेशाप्रमाणे याबाबतचा हेक्टरी १३,५००/- रु. प्रमाणे प्रति शेतकरी कांदा अनुदान यादी तहसील कार्यालय, चिखली नैसर्गिक आपत्ती विभागात तलाठी मंडळ अधिकारी यांच्या संयुक्त सह्यानिशी सादर करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या गावनिहाय यादीनुसार तत्काळ अनुदान रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी, चिखली तहसीलला खालील प्रमाणे निधी उपलब्ध देण्यात यावा.

अशी मागणी शेतकर्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक यांनी एस रामामुर्ती यांच्यासोबत चर्चा करीत पत्राव्दारे केली आहे.दरम्याण चौकशी करुण शेतकर्याना न्याय देणार असल्याचे अश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले आहे.तर मागण्यांची पुर्तता न झाल्यास तिव्र आंदोलन छेडु असा इशारा शेतकर्यासह सरनाईक यांनी दिला आहे.यावेळी गजानन कुटे,मनोज कुटे,सचिन कुटे,सुरेश पाटिल, नंदकिशोर आंभोरे,श्रावण बडगे,रमेश पवार,सतिष ठेंग,शैख रियाज शे हमजा,आनंद पानझाडे,यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

आमदार सौ महालेंनी सुद्धा मांडली शेतकर्याची बाजु.

जिल्हाधिकारी यांच्या दालनाबाहेर शेतकरी बसुन असल्याची माहिती आत बैठकीसाठी उपस्थीत असलेल्या चिखली मतदार संघाच्या आमदार सौ श्वेताताई महाले यांना कळताच त्यांनी शेतकर्याना आत बोलवुन घेत शेतकरी प्रश्नाला प्राधान्य देत स्वाभिमानी चे सरनाईक व शेतकरी यांच्याकडुन माहिती घेत शासनाकडुन मदत येवुनही

शेतकर्याच्या खात्यावर जमा होत नसेल तर संबंधीत प्रशासन जबाबदार असल्याचे सांगत पैसे का रखडले?याबाबत संतप्त होत याची चौकशी करावी व तातडीने नुकसानीची मदत वंचीत शेतकरी यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे शेतकर्याची बाजु मांडत आमदार सौ महाले यांनी केली आहे.

प्रतिनिधी - गोपाल उगले

English Summary: Grant for onion damaged by hailstorm due to negligence of administration despite funds from government
Published on: 04 December 2021, 07:21 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)