News

देशात मिरचीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते, शेतकरी बांधव या पिकातून चांगले उत्पन्न देखील अर्जित करतात. महाराष्ट्रात देखील मिरचीची लागवड लक्षणीय आहे. महाराष्ट्रातील खान्देश प्रांतातील नंदुरबार जिल्ह्यात मिरचीसाठी देशातील दुसऱ्या क्रमांकाची बाजार समिती देखील आहे. यावर्षी ह्या बाजार समितीत मिरचीची विक्रमी खरेदी होण्याची आशा व्यक्त होत आहे, कारण मागील एक महिन्यात बाजार समितीत तब्बल 60 हजार क्विंटल मिरचीची खरेदी झाली आहे.

Updated on 03 December, 2021 11:38 AM IST

लाल मिरचीने बाजारात हजेरी लावली आणि तिला बऱ्यापैकी भावही मिळत आहे. त्यामुळे नक्कीच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढत आहे. नंदुरबार बाजार समितीत दोन दिवसापूर्वी लिलाव बंद करण्यात आला होता, मार्केट कमिटीने पावसामुळे लिलाव बंद करण्याची घोषणा केली होती. परंतु आता बाजार समितीत व्यवहार सुरळीतपणे सुरु झाले आहेत, तसेच मार्केट मध्ये लाल मिरचीची आवक देखील लक्षणीय वाढली आहे.

 असे सांगितलं जात होत की, यावर्षी हवामान चांगले नसल्याने लाल मिरचीची लागवड हि उल्लेखनीय कमी झाली आहे, त्यामुळे लाल मिरचीची आवक हि कमी राहील. पण लाल मिरचीची खरेदी सुरु झाली आणि शेतकऱ्यांची बाजारात लाल मिरची विक्रीसाठी लगबग पाहायला भेटली. शेतकऱ्यांना यावर्षी लाल मिर्चीला उचित मोबदला देखील मिळत आहे, त्यामुळे मिरची उत्पादक शेतकरी समाधानी असल्याचे चित्र दिसत आहे.

मागच्या एक महिन्यात गुजरात तसेच राज्यातील इतर जिल्ह्यातुन लाल मिरचीची सुमारे 60 हजार क्विंटल आवक नंदुरबार बाजार समितीत आली असल्याचे सांगितलं जात आहे. मार्केट कमिटीने सांगितलं की, येत्या काळात लाल मिरचीची आवक अशीच टिकून राहिली तर यावर्षी लाल मिरचीची रेकॉर्ड आवक होईल.

 मागील दोन दिवस लाल मिरचीचा लिलाव ठप्प असल्याने, आता लाल मिरचीची आवक अजूनच वाढली आहे. पण याचा मिरचीच्या बाजारभावावर परिणाम झालेला दिसत नाही आहे.

बाजार समितीत च्या आवारात लाल मिरचीचा गंज लागला असून मिरचीची गुणवंत्ता टिकवून ठेवण्यासाठी मिरची सुकविण्याचे काम जोरात सुरु आहे.

 यावर्षी लाल मिरचीचे भाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण की, अजून बाजारात चांगल्या क्वालिटीची मिरची येत नाही आहे. जेव्हा चांगल्या क्वालिटीची मिरची बाजारात येईल तेव्हा मिरचीचे भाव अजून वाढतील, निश्चितच भविष्यात लाल मिरचीला चांगला भाव मिळेल. सध्या लाल मिरचीला पंधराशे ते तीन हजार पर्यंत भाव मिळत आहे.

English Summary: grand entry of red chilli in nandurbaar krushi utppan bajaar samiti
Published on: 03 December 2021, 11:38 IST